Homeताज्या बातम्या

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये भाजपचे रक्तदान महाशिबिरडॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या ‘रक्तदान महाअभियान’ अंतर्गत शहरातील सौ.के.एस.के. महाविद्यालयात भाजपा बीड मंडळ आयोजित

सार्वजनिक आरोग्य हिताचा स्तुत्य उपक्रमकेशव नागरगोजे यांच्या उपस्थितीत आयुष्मान आरोग्य मंदिरात पोलिओ लसीकरण व आरोग्य सुविधांची पाहणी
एन.आय.एम.ए.च्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. अशोक सानप यांची बिनविरोध निवड
बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान; बाळासाहेब सोनटक्के यांच्या हस्ते सत्कार



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या ‘रक्तदान महाअभियान’ अंतर्गत शहरातील सौ.के.एस.के. महाविद्यालयात भाजपा बीड मंडळ आयोजित रक्तदान शिबिराचे बुधवारी (दि.22) उद्घाटन केले. हा उपक्रम डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह भाजप बीड मंडळातील पदाधिकार्‍यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे बीड मंडळाचे मनोज पाटील, अशोक रसाळ, शहर मंडळाचे अशोक लोढा, गणेश लांडे, महादेव नागरगोजे, गणेश वाघमारे, नगरसेवक शुभम धुत, मंगेश धोंगडे, सय्यद मुस्तफा, नंदू पिंगळे, मुन्ना गायकवाड, अशोक तांबारे, शुभम कांतागळे, अमर विद्यागर, नाना सुरवसे, डॉ.रमेश शिंदे, विठ्ठल गुजर, ज्ञानेश्वर राऊत, दत्तप्रसाद सानप, उद्धव म्हेत्रे, गणेश लांडे, महादेव नागरगोजे, भगीरथ काळे, राजू महुवाले, शुभम वीर, प्रीत कुकडेजा, कुलकर्णी यांच्यासह रक्तदाते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी रक्तदान केले. शिबिरात रक्तसंकलनाचे काम डॉ.शुभांगी गिते, डॉ.कोमल कदम, डॉ.पल्लवी निकाळजे, अतुल गदादे, संतोष गायकवाड आणि दिलीप औसरमल यांनी केले. प्रास्ताविक अशोक लोढा यांनी केले. सूत्रसंचालन करून कॅप्टन डॉ.बी.टी.पोटे यांनी आभार मानले. यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ.सुधाकर गुट्टे, डॉ.विश्वंभर देशमाने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ.अनिता शिंदे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.ए.एस.खान, कमवि उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा.जालिंदर कोळेकर, एन.सी.सी. विभाग प्रमुख डॉ.बी.टी. पोटे, रासेयो प्रमुख प्रा.पी.आर. वाणी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, रक्तदाते, विद्यार्थी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS