नगरच्या श्रीविशाल गणपतीला चांदीची रत्नजडित अंगठी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या श्रीविशाल गणपतीला चांदीची रत्नजडित अंगठी

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरचे ग्रामदैवत असलेल्या 11 फुटी विशाल गणपतीस चांदीची रत्नजडीत अंगठी भेट मिळाली आहे. प्रती अमिताभ बच्चन म्हणून ओळख असलेले नगरचे स

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बुधवारी सपत्नीक श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.
10 हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत
कोपर्डीतील युवकाचे अपघाती निधन

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरचे ग्रामदैवत असलेल्या 11 फुटी विशाल गणपतीस चांदीची रत्नजडीत अंगठी भेट मिळाली आहे. प्रती अमिताभ बच्चन म्हणून ओळख असलेले नगरचे सिने अभिनेते महेश (मुकेशताभ) मेहता यांनी पत्नी मीना मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत श्रीविशाल गणपतीस रत्नजडित चांदीची अंगठी अर्पण केली. तिची किंमत सुमारे 72 हजार रुपये आहे.
रविवारी कामिका एकादशीच्या मुहूर्तावर श्री विशाल गणेशाची षोडशोपचार पूजा करून गणपतीच्या उजव्या हाताच्या मापाची चांदीची अंगठी मेहता यांनी अर्पण केली. नगरचे प्रसिद्ध मूर्तीकार सुनील नाळके यांनी खास मोठ्या आकाराची ही अंगठी तयार केली आहे. याबद्दल माहिती देताना मेहता म्हणाले, श्री विशाल गणेशावर अपार श्रद्धा आहे. 40 वर्षांपूर्वी मी श्रींना चांदीचे डोळे अर्पण केले होते. आता या गणपतीला सर्व प्रकारचे अलंकार आहेत. फक्त अंगठीच नव्हती. त्यामुळे पत्नीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नजडित चांदीची अंगठी अर्पण केली आहे. माझा मुलगा प्रतीक याचीही या गणपतीवर खूप श्रद्धा आहे. त्याच्या इच्छेनुसार आज हा योग आला आहे. सध्या प्रतिक अमेरिकेत नोकरीस असल्याने मोबाईलवर ऑनलाईन पूजा त्याने पाहिली आहे. गणपतीकडे मी जे मागितले, त्यापेक्षा मला अधिक मिळाले आहे. सर्व भाविकांना गणेशाचा असाच कृपा आशीर्वाद मिळावा, अशी प्रार्थनाही मेहता यांनी यावेळी केली. यावेळी विशाल गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष पंडित खरपुडे, विजय कोथिंबिरे, पुजारी विजय क्षीरसागर व भाविक उपस्थित होते. विशाल गणपती ट्रस्टच्यावतीने महेश मेहता व मीना मेहता यांचा सत्कार करून आभार मनाण्यात आले.

COMMENTS