Homeताज्या बातम्याअहमदनगर

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात श्रीगोंद्यात औषध विक्रेत्यांचे निवेदन

श्रीगोंदा : अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आवाहनानुसार बुधवार (दि. २० मे) रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुका औषध विक्रेता संघटनेतर्फे श्रीगोंदा पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले.या निवेदनात देशभरात तसेच राज्यात बेकायदेशीर पद्धतीने संकेतस्थळांच्या माध्यमातून सुरू असलेल्या औषध विक्रीला विरोध करण्यात आला आहे. शासनाच्या विविध अधिसूचना व निर्णयांचा गैरवापर करून संकेतस्थळांद्वारे औषध विक्री सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.या विषयावर संबंधित मंत्री व प्रशासकीय अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदने देऊन प्रत्यक्ष भेटीद्वारे मागणी करण्यात आली होती. मात्र शासन व प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका न घेतल्याने अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने देशव्यापी बंदची हाक दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.महाराष्ट्रातील तसेच श्रीगोंदा तालुक्यातील औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. बंददरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक सहकार्य करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.संघटनेचे अध्यक्ष संजय पठारे, सचिव अमोल जगताप तसेच कोषाध्यक्ष रोहन कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गोदावरी पात्रातील अवैध वाळू उत्खननावर मध्यरात्री छापा; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट-बीड शहरातील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी निधीची मागणी-बीड शहर, ग्रामीण भागातील विविध विकासकामांबाबतही निवेदन सादर
नागपूरमध्ये चहा पिण्यासाठी थांबणे पडले महाग; बँकेतून काढलेले ५ लाख रुपये चोरांनी अवघ्या काही सेकंदांत कारमधून केले लंपास, थरारक घटना CCTV मध्ये कैद!

COMMENTS