मुंबई : जामखेड येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ते १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरित करण्यात आले असून, रुग्णालय

मुंबई : जामखेड येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ते १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरित करण्यात आले असून, रुग्णालय व संलग्न कर्मचारी निवासस्थानाच्या इमारत बांधकामासाठी पुरवणी मागण्यांमधून २६ कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे ही तरतूद मंजूर झाल्याने जामखेड व परिसरातील नागरिकांना सुसज्ज आरोग्यसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये या निधीचा समावेश करण्यात आला. त्यामुळे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीच्या कामाला गती मिळणार आहे.
प्रस्तावित रुग्णालयाची इमारत तळमजला अधिक तीन मजले अशी चार मजली उभारण्यात येणार आहे. रुग्णालयासोबतच कर्मचारी निवासस्थानाचेही बांधकाम करण्यात येणार असून, निधी उपलब्ध झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही कामे तातडीने हाती घेतली जाणार आहेत. उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीमुळे जामखेड तालुक्यासह परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार व सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS