नेवासा / चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला

नेवासा / चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला आर्ट ऑफ लिव्हिंगचे तुकाराम मुरलीधर जावळे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले; तर आर्ट ऑफ लिव्हिंग टीमचे मंजुषा सुभाष गडाख, सुभाष गडाख, अविनाश जगदाळे आणि शिवाजी कराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अंशुमन वाकचौरे, उपप्राचार्य रघुनाथ भोजने, पर्यवेक्षक राजेश शेंडगे, उच्च माध्यमिक विद्यालय समन्वयक प्रा. भाऊसाहेब तांबे, प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. रावसाहेब राशिनकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष किरण जावळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वाती दळवी, रुक्मिणी सोनवणे, अनिता भांड-राशिनकर, युवराज गायकवाड, फरिदा पठाण, अश्विनी दहातोंडे, ज्येष्ठ शिक्षिका अर्चना निराळे, शरयू मरडे, ज्येष्ठ शिक्षक हरीश दगडखैर, जालिंदर शेटे, बबन घोडे, राजेंद्र पाठक, सिराज शेख, संदीप शेंडगे, दीपक निमसे, स्वप्निल मालवंडे, प्रवीण कार्ले, संदीप कासार, रोशन सरोदे, प्रा. भगवान भाबड, प्रा. संदीप बुचकूल, प्रा. भाऊसाहेब पानसरे, प्रा. दिलीप ससे आणि प्रा. रंजना काकड यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने योग दिनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्व उपस्थितांनी विविध योगासने, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर केली.
या कार्यक्रमाला इयत्ता पाचवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा शिक्षिका दीपिका राक्षे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ शिक्षक संजय ढेरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला व शेवटी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS