Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाडिक अभियांत्रिकीमध्ये कोल्हापूर विभागीय क्रीडा स्पर्धेची प्रथम सभा

इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेच्या कोल्हापूर विभा

शिराळा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी
तहसिलदार सतिश कदम यांनी अर्थशास्त्रात पीएच. डी.
विधानसभा अध्यक्षपदी आ. पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी शक्य

इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेच्या कोल्हापूर विभागीय क्रीडा स्पर्धेची प्रथम सभा झाली. सभेसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक व क्रीडा प्रतिनिधी उपस्थित होते.
सभेच्या प्रथम सत्रात श्री. व्यंकटेश्‍वरा शिक्षण संस्थेचे सचिव राहुल महाडिक यांच्या हस्ते हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेस सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक महेश जोशी यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये महाविद्यालयाच्या स्थापनेपासून महाविद्यालयामध्ये झालेल्या विविध खेळांच्या उपक्रमांचा आढावा घेतला.
तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या पहिल्या विभागीय क्रीडा स्पर्धा आहेत. याचे यजमानपद स्विकारुन ते पूर्णत्वास नेताना आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे, असे मत राहुल महाडिक यांनी आपल्या मनोगतात मांडले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य व कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष डॉ. बी. श्रीनिवास वर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. निलेश साने उपस्थित होते. सभेच्या दुसर्‍या सत्रात महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक व कोल्हापूर विभागीय क्रीडा स्पर्धेचे सचिव प्रा. संदीप पाटील यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून सभेतील सर्व विषयांची चर्चा केली. यावेळी विविध खेळाचे आयोजक ठरविण्यात आले. तसेच तारखा निश्‍चित करण्यात आल्या. यावेळी पात्रता समिती, तक्रार निवारण समिती, निवड समिती आदी समित्या गठीत करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सत्यजित घोरपडे यांनी केले. आभार प्रा. अमृत पाटील यांनी मानले.

COMMENTS