Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जावळीच्या तहसीलदारांनी मालदेव घाटातील वणवा कर्मचार्‍यांसोबत विझवला

मालदेव : खिंडीत डोंगराला लागलेला वणवा आटोक्यात आणताना तहसीलदार राजेंद्र पोळ व सहकारी कर्मचारी. कुडाळ / वार्ताहर : जावळीचे कर्तव्यदक्ष अधिकारी तहसी

अवकाळी पावसाने द्राक्ष, कांद्यानंतर आता भाजीपालाल्या देखील फटका 
बोगस बि-बियाण्यांसह खतांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी : पालकमंत्री
म्हसवड शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत

कुडाळ / वार्ताहर : जावळीचे कर्तव्यदक्ष अधिकारी तहसीलदार राजेंद्र पोळ हे गुरुवारी दुपारच्या सुमारास मेढा कुडाळ मार्गावरून जात असताना मालदेवच्या खिंडीत डोंगराला वणवा लागलेला त्यांनी पहिला. कोणताही विचार न करता सोबत असणार्‍या कर्मचार्‍यांसह त्यांनी वणवा विझवण्यासाठी आपला मोर्चा वळवला. सुमारे अर्धा ते एक किलोमीटर पायपीट करून त्यांनी हा वणवा आटोक्यात आणला. वनव्याचा भडका पाहता यात निसर्गसंपदा पुरती नष्ट होणार होती. मात्र, तहसीलदारांनी दाखवलेल्या दक्षतेने वनसंपदेच्या संरक्षणाबरोबर त्यांच्या कृतीतून निसर्ग संरक्षणाचा संदेश देत सर्वांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
गुरूवारी दुपारच्या सुमारास तहसीलदार राजेंद्र पोळ हे आपल्या कर्मचार्‍यांसोबत कामानिमित्त मेढ्याकडून कुडाळकडे निघाले होते. यावेळी मालदेवच्या घाटात त्यांना वनवा लागलेला दिसला. मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्यांनी आपली गाडी वनवा लागलेल्या दिशेने वळवायला सांगितली. पसरणारा वणव्याची दाहकता पाहता पटकन गाडीतून खाली उतरून त्यांनी वणवा विझविण्यात सुरुवात केली. सोबत असणारे चालक बेलोशे, तलाठी सावंत, कांबळे यांच्यासह हातात झाडांच्या फांद्या घेऊन जवळपास एक किलोमीटरच्या परिसरातील वणवा विझवण्याचा प्रयत्न केला.
दुपारच्या भर उन्हाची दाहकता यात वनव्याची उष्णता होती. मात्र, या सार्‍यांची तमा न बाळगता अंगातून घामाच्या धारा वाहत असताना त्यांनी वणवा विझवण्याचे काम चालू ठेवले होते. याची माहिती वनसंपदेच्या संरक्षणासाठी धडपडणार्‍या जावळी मित्रमेळा संस्थेच्या कार्यकर्त्यांना व वनविभागाला मिळताच मंडळाचे कार्यकर्ते व वन विभागाचे कर्मचारी कर्मचारी येथे दाखल झाले. सर्वांनी मिळून मालदेव घाटात लागलेला वणवा विझवला. याठिकणी तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी दाखवलेली कर्तव्यदक्षता, आपल्या वनसंपदेचे संरक्षणासाठी केलेली धडपड नक्कीच सर्वांसाठी आदर्शवत आहे. यातून समाजाला चांगला संदेश मिळाला असून अधिकारी पदाची चाकोरी आणि शिस्तबध्दता याला जावळीचे तहसीलदार अपवाद ठरले आहेत.

COMMENTS