Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साठ लाखांच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण

पोलिसांनी केली मुलाची सुटका, आरोपी फरार

पुणे : पुण्यात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी नवे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हेगारांची परेड घेऊन त्यांना सज्जड इशारा दिल्यानंतरही गु

अकोलेतील शिक्षण व सिंचनाचा प्रश्‍न प्रलंबितच ः पांडे
राज्यातील 125 कृषी उपसंचालक सामूहिक रजेवर
तगरखेडा येथील शेतकर्‍याची आत्महत्या

पुणे : पुण्यात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी नवे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हेगारांची परेड घेऊन त्यांना सज्जड इशारा दिल्यानंतरही गुन्हेगारी कमी होतांना दिसून येत नाही.  एका महिलेला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना ताजी असतांना आता 60 लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका 10 वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी भारती विद्यापीत पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. याची दाखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलाची सुटका केली आहे. मात्र, आरोपी पसार झाले आहे. भारती विद्यापीठ परिसरामधून एका 10 वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी मुलाच्या कुटुंबियांकडे 60 लाख रुपयांची मागणी केली होती. दरम्यान, याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. दरम्यान, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने देखील या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ पथके रवाना केली. दरम्यान, मुलाची सुरक्षितता हा मुख्य उद्देश होता. त्या दृष्टीने तपास करण्यात येत होता. पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली त्यानुसार कारवाई करत पुणे आणि सातारा पोलिसांच्या दोन पथकांनी आरोपींच्या तावडीतून मुलाची सुखरूप सुटका केली, मात्र, या कारवाईत आरोपी फरार झाले आहे. सध्या पोलिस त्यांच्या मागावर आहेत. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

COMMENTS