Homeताज्या बातम्या

अर्धापूरात कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या 12 गोवंशाची सुटका; पिकअपसह 8.65 लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांना अटक, एक आरोपी फरार

अर्धापूर - अर्धापूर पोलिसांनी गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तलीसाठी साठवणूक करणार्‍यांविरोधात धडक कारवाई करत 12 गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारव

वाहनांच्या काचा फोडून ऐवज अन् महत्त्वाची कागदपत्रे लंपास; अहिल्यानगरमधील दिल्लीगेट व पत्रकार चौक परिसरातील घटना
रस्ता मंजूर, निधी मंजूर; काम कधी सुरू होणार? प्रा. सनी वाघमारे यांचा प्रशासनाला संतप्त सवाल
विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती ६ ते ८ ऑगस्ट दरम्यान नांदेड जिल्हा दौर्‍यावर; किनवटसह विविध विभागांचा घेणार झाडाझडती
Nanded cattle smuggling : १२ गोवंश अन् वाहनासह ८.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त;  तीन जणांवर गुन्हा दाखल

अर्धापूर – अर्धापूर पोलिसांनी गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तलीसाठी साठवणूक करणार्‍यांविरोधात धडक कारवाई करत 12 गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत महिंद्रा पिकअप वाहनासह एकूण 8 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. 10 ऑगस्ट रोजी अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, अर्धापूर शहरातील करीम कॉलनी परिसरातील कॅनॉलच्या पूर्वेकडे गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करून कत्तलीच्या उद्देशाने साठवणूक करण्यात आली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात सापळा रचून कारवाई केली. यावेळी एमएच 32 क्यू 5138 क्रमांकाच्या महिंद्रा पिकअप वाहनात तीन जनावरे कोंबून ठेवलेली आढळली. तर जवळील टिनपत्र्याच्या शेडमध्ये आणखी नऊ जनावरे निर्दयीपणे बांधून ठेवलेली होती. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून सर्व 12 जनावरांची सुटका केली. या कारवाईत 12 गोवंशीय जनावरांची अंदाजे किंमत 4 लाख 65 हजार रुपये, तर महिंद्रा पिकअप वाहनाची किंमत 4 लाख रुपये असा एकूण 8 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तुळशिदास दादाराव गावंडे (31, रा. विठोली, जि. यवतमाळ), शेख करीमुद्दीन शेख वहीमोद्दीन (38, रा. बिलालनगर, अर्धापूर) आणि नामदेव देवराव नरवाडे (58, रा. शेवाळा, जि. हिंगोली) यांना ताब्यात घेण्यात आले असून शिवाजी किशनराव मस्के (रा. शेणी, जि. नांदेड) हा आरोपी फरार आहे. आरोपींविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले तसेच पोलीस अंमलदार भीमराव राठोड, संजय घोरपडे, सुभाष मुंगल, सलीम शहा, ज्ञानेश्वर भिसे, हेमंत बिचकेवार आणि कृष्णा चुनोडे यांच्या पथकाने केली.

COMMENTS