Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पतसंस्था चालविताना घ्यावयाची दक्षता यावर विचार मंथन बैठक

अहमदनगर- जिल्हयामध्ये संपदा व इतर पतसंस्था मध्ये जे घडले त्यामुळे पतसंस्था चळवळीत संभ्रमावस्था झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी पत

वादळ आणि अतिवृष्टीमुळे एकाच कुटूंबातील तिघांसह चौघांचा मृत्यु
सोळाशे कोटी रुपयांचे बेकायदा दगड उत्खनन? : राज्यपालांकडे गायके यांची तक्रार
नगरमध्ये दंगली घडवण्याचे षडयंत्र शिजत आहे काय? : शहर काँग्रेसची पोलिसांना विचारणा

अहमदनगर- जिल्हयामध्ये संपदा व इतर पतसंस्था मध्ये जे घडले त्यामुळे पतसंस्था चळवळीत संभ्रमावस्था झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, नाशिक विभागीय  सहकारी पतसंस्था फेडरेशन ,अहमदनगर जिल्हा सहकारी स्थैर्यनिधी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पतसंस्था चे चेअरमन, मॅनेजर, संचालक यांची  पतसंस्था चालविताना घ्यावयाची दक्षता यावर विचार मंथन बैठक ,मेळावा नुकताच संपत्र झाला. त्यास मोठ्या संख्नेने उपस्तीथी होती 

        या मेळाव्यात  नगर जिल्हयातील सर्व पतसंस्थांना आर्थिक पायावर भक्कम उभे   करून सहकारी पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, नाशिक जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन अहमदनगर जिल्हा सहकारी स्थैर्यनिधी संघ संयुक्तपणे प्रयत्न करीत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाच्या तथा काका कोयटे यांनी दिली.

         या विचार मंथन  बैठक मेळाव्यात बैठकीचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, निमंत्रक सुरेशजी वाबळे, उपाध्यक्ष वसंत लोढा, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक वासुदेवजी काळे व मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे , ,सहा निबंधक हर्षद तावरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पतसंस्थांचे ऑडिटर, कर्मचारी वर्ग,संचालकांची बेफिकिरी, कधी तपासणी करत नाही , सोने तारण आदी विषयवार चर्चा करण्यात आली, येथून पुढे कोणतीही पतसंस्था अडचणीत येऊ नये यासाठी प्रयत्न करणार आहे 

             नगर  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यपध्दतीबददल मेळाव्यात उपस्थित सर्व पतसंस्था प्रतिनिधींकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जिल्ह्यातील  पतसंस्थांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2500 कोटी रूपये इतकी गुंतवणूक असून देखील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक अडचणीच्या काळात पतसंस्थांना कोणतीही मदत करीत नाही, नगर जिल्हयाचे विद्यमान पालकमंत्री ना  राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन  असताना त्यांनी नगर जिल्ह्यातील पतसंस्थांच्या  ठेवींना १ टक्के  जादा व्याज दर तर दिलाच व त्याबरोबरच अडचणीत येत असलेल्या पतसंस्थांना कर्जरूपाने आर्थिक मदत देखील केली परंतु त्यानंतर कधीही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक सहकारी पतसंस्थांच्या मदतीला धावून आली नाही. 

या बैठकीत पुढील प्रमाणे ठराव संमत करण्यात आले. लोकसभेच्या निवडणुका  संपल्यानंतर  नगर जिल्हयाचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा  सहकारी बँकेचे चेअरमन  शिवाजीराव कर्डीले  यांचे उपस्थितीत जिल्हयातील पतसंस्थांचा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अडचणीतील पतसंस्थांना स्थावर मालमत्तेच्या सुरक्षित तारणावर कर्ज द्यायचे नाकारल्यास नगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सर्व गुंतवणूका काढून घेतील व जी बैंक अडीअडचणीत पतसंस्थांच्या मागे उभी रहायला तयार असेल त्या बँकेत  जिल्ह्यातील सर्व पतसंस्था गुंतवणूक करतील. नगर जिल्हयातील सहकारी पतसंस्था सिबील व क्रास प्रणाली वापरूनच कर्ज पुरवठा करतील, त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने विकसीत केलेली क्रास प्रणाली सर्व पतसंस्था स्विकारतील. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सहकार खात्यातील अधिकान्यांना बरोबर घेवून बैठका घेणार व पत्तसंस्थांना अडीचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करणार. नगर जिल्हयातील कोणतीही पतसंस्था अंशदान भरणार नाही. आम्हाला ठेव विमा संरक्षण हवे आहे. पण त्यासाठी अंशदान सक्ती  करू नये. असे विविध ठराव करण्यात आले 

COMMENTS