Homeताज्या बातम्या

संगमनेरमध्ये अमृतवाहिनी आयटीआयच्या १०७ विद्यार्थ्यांना बजाज ऑटोमध्ये नोकरी; कॅम्पस इंटरव्यूमध्ये मोठे यश

संगमनेर: अमृतवाहिनी आयटीआय अमृत नगर येथे १४ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्यूमध्ये १०७ विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षेपूर्वीच न

बीड नगर परिषदेतील प्रतिनिधींकडून सतत महिन्यांच्या गनतीची उजळणी; मनाने नाही तर निदान दाखविल्यावर तरी कामे करा – एस.एम.युसूफ
मध्यरात्री सिनेस्टाईल पाठलाग; गोतस्करीचा मोठा डाव वडवणी पोलिसांनी उधळला
तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा! विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
Amrutvahini Industrial Training Institute, Amrutnagar, Tal. Sangamner,  Dist. Ahmednagar

संगमनेर: अमृतवाहिनी आयटीआय अमृत नगर येथे १४ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्यूमध्ये १०७ विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षेपूर्वीच नामांकित बजाज ऑटो लि. पुणे या कंपनीत निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य विलास भाटे यांनी दिली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना भाटे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून अमृतवाहिनी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेतील अनेक विद्यार्थी देश-विदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता अमृतवाहिनी आयटीआयच्या १०७ विद्यार्थ्यांना बजाज ऑटो कंपनीत रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे.

१४ जुलै रोजी झालेल्या या कॅम्पस इंटरव्यूमध्ये बजाज ऑटोचे एचआर मॅनेजर गणेश जाधव व प्रोडक्शन मॅनेजर तानाजी पाटील यांनी अंतिम वर्षाच्या मेकॅनिक, मोटर व्हेईकल, मेकॅनिक डिझेल, फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) या ट्रेडच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यामधून एकूण १०७ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राध्यापक व्ही. बी. धुमाळ, अकॅडेमिक डायरेक्टर डॉ. जे. बी. गुरव आणि प्राचार्य विलास भाटे आदींनी अभिनंदन करून पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS