Homeताज्या बातम्या

कुंडलवाडीत अधिक मासानिमित्त श्री कुंडलेश्वर महादेव मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची भक्तिमय पर्वणी; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कुंडलवाडी : येथील ग्रामदैवत तथा कुलदैवत श्री कुंडलेश्वर महादेव मंदिरात अधिक मासानिमित्त (पुरुषोत्तम मास) विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे

बिलोली-धर्माबाद बसस्थानकांचा मराठवाड्यात अव्वल क्रमांक; ‘स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ अभियानात पटकावला मान
कुंडलवाडीत ‘एअरटेल’ नेटवर्क वारंवार खंडित; रिचार्जचे दर वाढले, सेवा मात्र ढासळल्याने ग्राहक त्रस्त
कुंडलवाडी बस स्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत;  नागरिकांची लवकर सुरू करण्याची मागणी

कुंडलवाडी : येथील ग्रामदैवत तथा कुलदैवत श्री कुंडलेश्वर महादेव मंदिरात अधिक मासानिमित्त (पुरुषोत्तम मास) विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या महिनाभर चाललेल्या धार्मिक उपक्रमांना कुंडलवाडी व परिसरातील महिला व पुरुष भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मंदिरात मोठी गर्दी केली होती.

अधिक मासाचे औचित्य साधून मंदिर परिसरात दररोज विष्णुसहस्त्रनाम पठण, शिवपाठ, शिवस्तुती, भागवत अध्याय वाचन, अधिक मास पुराण वाचन आणि महाआरती यांसारखे विविध आध्यात्मिक उपक्रम राबवण्यात आले. यामुळे संपूर्ण महिनाभर मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. या धार्मिक कार्यक्रमांमुळे भाविकांना मोठा आध्यात्मिक लाभ मिळाला असून समाजात धर्म, संस्कार व भक्तीची भावना वृद्धिंगत होण्यास मदत झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.

या सर्व कार्यक्रमांची सविस्तर माहिती मंदिराच्या अर्चक शैलेजाताई आनंदराव इनामदार यांनी दिली. हा धार्मिक उत्सव यशस्वी करण्यासाठी पुजारी अच्युत महाराज जोशी, तेजेराव पाटील गवते, शंकरराव खरबाळे, पांडे, रामलू पेंटावार, ढगे, भोकरे, अर्चनाताई दाचावार, चव्हाण मॅडम, टोंगेबाई, सागरबाई मंडगे, मलाबाई मलकूवार, शोभाबाई ईरलावार, सागरबाई भूसावार आदींसह सर्व शिवभक्तांनी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS