भास्करराव पाटील खतगावकर यांची काँग्रेस प्रवेशाची घोषणा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भास्करराव पाटील खतगावकर यांची काँग्रेस प्रवेशाची घोषणा

नांदेड : राज्यात आगामी निवडणुकांना सामौरे जाण्याआधीच पक्षबदलाचे संकेत देत अनेकजण, मूळ पक्षातून इतर पक्षात प्रवेश करतांना दिसून येत आहे. अशातच नांदेड

परमबीर सिंह यांना न्यायालयाने फटकारले ; याचिका फेटाळली; कनिष्ठ न्यायालयात जाण्याचा सल्ला
आठवडा बाजारासाठी जाणाऱ्या टेम्पोचा झाला अपघात
सावकारांनो याद राखा : धन्यकुमार गोडसे


नांदेड : राज्यात आगामी निवडणुकांना सामौरे जाण्याआधीच पक्षबदलाचे संकेत देत अनेकजण, मूळ पक्षातून इतर पक्षात प्रवेश करतांना दिसून येत आहे. अशातच नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार पडले आहे. देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मोठी फळी तयार झाली आहे. माजी मंत्री व ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ते पुढे म्हणाले की, भाजपा हा शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. परंतु, बेशिस्तीचा कळस गाठण्याचे काम भाजपाचे खा. चिखलीकर यांनी जिल्ह्यात केले आहे. ही बाब अनेकदा राज्य नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. उलट चिखलीकरांना अधिक ताकद देऊन होणार्‍या अन्यायाला एकप्रकारे खतपाणी घातले. देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचा उमेदवार ठरवताना माझे मत विचारात घेणे अपेक्षित होते. परंतु, तसे न करता खा. चिखलीकर यांच्या हट्टामुळे शिवसेनेतून आयात केलेल्या सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली. म्हणजे उमेदवार चिखलीकरांनी ठरवायचा आणि त्याच्या पराभवानंतर त्याचे सारे खापर माझ्यावर फोडायचे, असे कारस्थान चालू असल्याचे मला स्पष्ट दिसल्यामुळेच मी भाजपाचा राजीनामा देत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादंग पाहायला मिळतो. अशातच नांदेड जिल्ह्यात देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकी आधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह भारतीय जनता पक्षातील अनेक पदाधिकारी भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचे समोर येत आहे. यामुळे निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातो. देगलूर पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रावसाहेब अंतापूरकर निश्‍चित विजयी होणार, आमचा त्यांना पाठिंबा आहे अशी घोषणा भास्करराव पाटील खतगावकर यांनी केली आहे. इतकेच नाहीतर आपण भाजपचा राजीनामा देणार असून काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

देगलूर पोटनिवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा
देगलूर पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रावसाहेब अंतापूरकर निश्‍चित विजयी होणार, आमचा त्यांना पाठिंबा आहे अशी घोषणा भास्करराव पाटील खतगावकर यांनी केली आहे. इतकेच नाहीतर आपण भाजपचा राजीनामा देणार असून काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

निष्ठावंतांना बेदखल करण्याचे काम
भाजपाची नांदेड जिल्ह्यात जोमाने वाटचाल सुरू असताना शिवसेनेत कार्यरत असलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपात घेण्यात आले. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्यायाची मालिकाच सुरू केली. अवघा पक्ष चिखलीकरांच्या दावणीला बांधला गेला. भाजपातील जुने व निष्ठावंत व आमच्यासारखी झोकून देऊन काम करणारी मंडळी बेदखल करण्याचे काम खा. चिखलीकर यांनी सुरू केल्याचेही खतगावकर यांनी सांगितले.

COMMENTS