Homeताज्या बातम्या

आश्वी बुद्रुक येथे प्रवरेच्या कृषीदूतांचे उत्साहात स्वागत; शेतकऱ्यांना करणार आधुनिक शेतीचे मार्गदर्शन

Oplus_16908288 लोणी : आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथे कृषी महाविद्यालय, लोणी येथील कृषीदूतांचे आगमन झाले असून, स्थानिक शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थां

अहिल्यादेवींच्या जयंतीपूर्वी चोंडी मार्गाची दुरुस्ती करा; रस्त्याची दयनीय अवस्था, नागरिकांची मागणी
रुढींना फाटा देत ‘देहदानाचा’ आदर्श! वडिलांचे पार्थिव वैद्यकीय शिक्षणासाठी दान; राहात्यातील गांधी कुटुंबाचा निर्णय
राहुरीत रहस्यमय ड्रोनचे गूढ अधिक गडद; अँटी-ड्रोन पथकाची कारवाई निष्फळ, आकाशात १० ड्रोन दिसल्याचा दावा
Oplus_16908288

लोणी : आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथे कृषी महाविद्यालय, लोणी येथील कृषीदूतांचे आगमन झाले असून, स्थानिक शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित कृषी महाविद्यालय, लोणी येथील हे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (RAWE) गावात दाखल झाले आहेत. संस्थेचे अध्यक्ष व जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, कृषी शिक्षण संचालक डॉ. उत्तमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल खडके, कार्यक्रम समन्वयक डॉ. रमेश जाधव, कार्यक्रम अधिकारी डॉ. विक्रम अनाप आणि प्रा. अक्षया वाळुंज यांच्या नियंत्रणाखाली कृषीदूत देवेंद्र शिंदे, सोहम शिंदे, ओंकार शिंदे, अनिकेत चोरमले व बाळासाहेब जवरे हे आश्वी बुद्रुक येथील शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव जाणून घेत त्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन करणार आहेत.

या विषयांवर करणार मार्गदर्शन: कृषी शिक्षणाच्या माध्यमातून हे कृषीदूत गावातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, बीजप्रक्रिया, गांडूळखत उत्पादन, सुधारित चारा पिके, दुग्ध व्यवसाय आणि बायोगॅस यांसारख्या विविध महत्त्वाच्या विषयांवर तांत्रिक माहिती व प्रात्यक्षिके देणार आहेत.

याप्रसंगी आश्वी बुद्रुकचे सरपंच नामदेव किसान शिंदे, उपसरपंच बाळासाहेब नानासाहेब मदने, ग्रामपंचायत लिपिक विजय रामचंद्र आवारे, ग्रामपंचायत अधिकारी गौतम जानेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS