Homeताज्या बातम्या

विष्णुपुरी येथे शिवपुराण कथा महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ; काळेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

नांदेड : विष्णुपुरी येथील श्री सत्संग सेवा समिती काळेश्वर यांच्या वतीने भव्य शिवपुराण कथा महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ झाला आहे. कथेच्या सुरुवातील

नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के 4.7 रिश्टर तीव्रता, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नांदेड जिल्ह्यातही ‘कोचिंग संस्कृती’चा वाढता प्रभाव; महाविद्यालयांतील उपस्थिती घसरली!
अशोकरावांविरुद्ध सर्वपक्षीय मोर्चेबांधणी? नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपला रोखण्यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली
Kaleshwar Temple Vishnupuri, Tal. Nanded, Dist. Nanded - Pilgrim Data  Services

नांदेड : विष्णुपुरी येथील श्री सत्संग सेवा समिती काळेश्वर यांच्या वतीने भव्य शिवपुराण कथा महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ झाला आहे. कथेच्या सुरुवातीला विख्यात शिवपुराण कथाकार ह.भ.प. शिवम शुक्ल महाराज यांनी ऐतिहासिक काळेश्वर मंदिरात महाआरती करून दर्शन घेतले. त्यानंतर काळेश्वर मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या हस्ते महाराजांचा भव्य सत्कार करण्यात आला.

या शिवपुराण कथेचे आयोजन १४ ते २० जून २०२६ दरम्यान दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत करण्यात आले आहे. कथेच्या पहिल्या दिवशी शिवम शुक्ल महाराज यांनी शिवपुराणाचे महात्म्य आणि त्याचे मानवी जीवनातील महत्त्व भाविकांना सविस्तर पटवून दिले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री सत्संग सेवा समिती व काळेश्वर समितीचे पदाधिकारी धारोजी हंबर्डे, बालाजी हंबर्डे, उत्तम हंबर्डे, किशोर उपाध्याय (शर्मा), राजेंद्र शुक्ल, सतीश भेडेकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक माणिकराव हंबर्डे, संतोष उर्फ गोलू हंबर्डे यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. पहिल्याच दिवशी कथेला महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.

अधिक मासानिमित्त काळेश्वर मंदिरात महिलांची मांदियाळी अधिक मासाचे औचित्य साधून १४ जून रोजी गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या स्वयंभू काळेश्वर मंदिरात सकाळपासूनच पंचक्रोशीतील महिला भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. महिलांनी गोदावरी नदी पात्रात पवित्र स्नान करून काळेश्वर महादेवाचे दर्शन घेतले आणि धोंडे अर्पण करून महाआरती केली. अधिक मासाच्या सांगतेनिमित्त शहर व ग्रामीण भागातील भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजला होता. या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचेही विशेष आयोजन करण्यात आले होते.

COMMENTS