Homeताज्या बातम्या

जयभीमनगरात मोठ्या भावाकडून लहान भावाचा दगडाने ठेचून खून

शहरातील जयभीमनगर परिसरात मोठ्या भावानेच लहान भावाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उड

राशीनमध्ये हातभट्टीवर पोलिसांचा छापा७८० लिटर रसायन व दारू नष्ट
जबरी चोरी करणारी सराईत टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त
देवळालीत हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा चौघांवर गुन्हा ; ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त



शहरातील जयभीमनगर परिसरात मोठ्या भावानेच लहान भावाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेत प्रकाश उत्तम खाडे (वय 20) याचा मृत्यू झाला आहे. तर खून करणार्‍या मोठ्या भावाचे नाव पप्पू उत्तम खाडे असे असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14 मे रोजी मध्यरात्रीनंतर साधारणपणे रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रकाश खाडे हा एका दुकानात असताना त्याचा मोठा भाऊ पप्पू खाडे याने त्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात प्रकाश गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, दोन्ही भावांमध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला होता याबाबत माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

COMMENTS