Homeताज्या बातम्याअहमदनगर

राष्ट्रवादीच्या रेट्यामुळे रस्ते कामांना प्रारंभ : त्रिभुवन 

कोपरगाव : शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन होऊनही कामांना प्रत्यक्ष सुरुवात होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. कोपरगाव नगरपरिषदेपुढील अडचणींमुळे रखडलेली ही कामे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर सोमवार (दि. १८) पासून सुरू झाल्याची माहिती नगरसेविका सोनम त्रिभुवन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.प्रभाग क्रमांक ११ मधील वाघ घर ते कन्या शाळा रस्ता अंतर्गत रस्ता बांधकामासाठी ६० लाख रुपये, तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत बालाजी अंगण ते किरण मवाळ घर रस्ता डांबरीकरणासाठी ८ लाख ४५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. या दोन्ही कामांसाठी आमदार आशुतोष काळे यांनी निधी उपलब्ध करून दिला असून चार ते पाच महिन्यांपूर्वी त्यांच्या हस्ते भूमिपूजनही झाले होते.मात्र, नगरपरिषदेतील तांत्रिक अडचणींमुळे कामांना सुरुवात होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अनेकदा निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. विकासकामांसाठी वेळेवर निधी उपलब्ध होत नसताना आमदार आशुतोष काळे यांनी निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही कामे रखडल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या होत्या, असे त्रिभुवन यांनी म्हटले आहे.पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने त्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण होणे आवश्यक होते. पावसाळा सुरू झाल्यानंतर डांबरीकरण करणे शक्य नसल्याने कामांना तातडीने प्रारंभ व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यातून अखेर सोमवारपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली आहे.रस्त्यांच्या कामांना प्रारंभ झाल्याने प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आ. आशुतोष काळे तसेच पाठपुरावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे आभार मानले.

आत्मा मालिकची खो-खो राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण कामगिरी
Ahmednagar : दरोडे टाकून लूटमार करणारी टोळी गजाआड (Video)
कर्जतच्या ’तहसील’मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशाची पायमल्ली

COMMENTS