काँगे्रसमध्ये पुन्हा दुफळीचे संकेत

Homeताज्या बातम्यासंपादकीय

काँगे्रसमध्ये पुन्हा दुफळीचे संकेत

काँगे्रस पक्षाच्या स्थापनेला उणीपुरी 135 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. स्वातंत्र्यानंतर काँगे्रस कायम सत्तेत राहिली. मात्र 1975 मध्ये आणीबाणीन

शरद पवारांची राजकीय चाल
कांदा धोरण ठरवण्याची गरज
पेगॅसस प्रकरणात केंद्राला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

काँगे्रस पक्षाच्या स्थापनेला उणीपुरी 135 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. स्वातंत्र्यानंतर काँगे्रस कायम सत्तेत राहिली. मात्र 1975 मध्ये आणीबाणीनंतर काँगे्रसला पर्याय देण्यासाठी अनेक पक्षांनी कंबर कसली. त्याचीच परिणाम म्हणजे भाजपची वाटचाल जोमाने झाली. 2014 पासून भाजप सत्तेत असून, काँगे्रसची अवस्था गलितगात्र झाली आहे. काँगे्रसला पुन्हा एक नवी दिशा देण्यासाठी नव्या फेरबदलाचे संकेत दिले आहेत. त्यासाठी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांना काँगे्रसमध्ये प्रवेश देण्याचा मार्ग जवळपास निश्‍चित झाला आहे. मात्र त्यांच्यावर नेमकी काय जबाबदारी आणि पद देणार यावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र प्रशांत किशोर यांचा प्रवेश काँगे्रससाठी डोकेदुखी ठरू शकतो. कारण, प्रशांत किशोर यांना काँगे्रसमध्ये प्रवेश दिल्यास काँगेसचे एककेंद्रीकरण होऊन, प्रशांत किशोर काँगे्रसमध्ये डोईर्र्र्र्र्जोड होईल, याची जाणीव जुन्या जाणत्या काँगे्रस नेत्यांना झाल्यामुळे पुन्हा एकदा सेामवारी जी-23 नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक मुद्दयावर चर्चा देखील झडल्या आहेत.
काँगे्रसला सध्या अध्यक्ष नाही. हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या आजारी असल्यामुळे, त्या काँगे्रसच्या संघटनात्मक बांधणीसाठी पूर्णवेळ देऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी सक्रिय असले, तरी त्यांच्या राजकारणामध्ये सातत्य नाही. त्यामुळे काँगे्रसला कार्यकर्त्यांना, नेत्यांना मार्गदर्शन करेल, किंवा त्यांना दिशा देऊ शकेल, असे नेतृत्व नसल्यामुळे, काँगे्रसकडे सध्या कोणताही राजकीय कार्यक्रम नाही. राजकीय कार्यक्रम नसल्यामुळे कार्यकर्ते शांत बसले आहे. देशभरात महागाई, पूरस्थिती, कोरोना नियंत्रण आणण्यात अपयश, यासह अनेेेेक प्रश्‍न उभे आहेत. मात्र विरोधक सक्षम नसल्यामुळे त्यांचा विरोध समोर येत नाही. अशा परिस्थितीमध्ये, आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. या लोकसभा निवडणूकांमध्ये काँगे्रसला प्रादेशिक पक्षांची मोट बांधून सक्षम पर्याय उभा करण्याचा पर्याय आहे. मात्र जन्माष्टमीच्या दिवशी कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक झाली होती. या बैठकीला काँग्रेसचे 23 नेते ज्यांना जी-23 म्हटले जाते, ते उपस्थित होते. हे नेते प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये घेण्याविरोधात आहेत. असे झाल्यास पक्षातील निर्णय हे आऊटसोर्स होतील, अशी भीती त्यांना वाटत आहे. महत्वाचे म्हणजे या बैठकीत काही नेते हे कधी काळी प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी बाजू मांडत होते.प्रशांत किशोर यांच्या येण्याच्या चर्चांनी हा गट नाराज आहे. हा गट दोन वर्षांपूर्वीच गांधी परिवारावर नाराज आहे. जी-23 बैठकीत प्रशांत किशोर यांना महासचिव पदावर नियुक्त करण्याच्या पक्षाच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सहभागी एका नेत्याने सांगितले की, आम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाहिले आहे, प्रशांत किशोर यांचे यश हे मर्यादित आहे. त्यांच्या पक्षात प्रवेशावर काँग्रेसच्या वर्किंग ग्रुपमधील बैठकीत चर्चा करण्यात यावी.
देशातील प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन 2024 मध्ये मोदी सरकारचा पराभव करता येऊ शकतो या विश्‍वासावर प्रशांत किशोर प्रादेशिक पक्षांची मोट बांधतांना दिसून येत आहे. मागील काळात त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्याही भेटी घेतली. तथापि त्यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या काही महत्वपूर्ण नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर आता नेमकं काय शिजतंय, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. आता ही राजकीय घडामोड भाजपसाठी मोठी धोक्याची घंटी आहे. याचा भाजपला अंदाज आल्यामुळे त्यांनी त्यासंदर्भात उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या कॅबिनेट विस्तारातील सोशल इंजिनिअरिंग बघता ते लक्षात येते. त्यात ओबीसी नेत्यांना मोठया प्रमाणात संधी देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे भाजपला शह द्यायचा असेल, तर सर्वच प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. मात्र प्रशांत किशोर यांना काँगे्रसमध्ये घेतल्यानंतर जर काँगे्रसमध्ये दुफळी पडल्यास, काँगे्रसला कुणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे प्रशांत किशोर यांचा काँगे्रस प्रवेश आणि काँगे्रसमधील दुफळी टाळण्याचे दुहेरी संकट प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांच्यासमोर आहे.

COMMENTS