पंजशीरच्या खोर्‍यात 350 तालिबान्यांचा खात्मा

Homeताज्या बातम्यादेश

पंजशीरच्या खोर्‍यात 350 तालिबान्यांचा खात्मा

काबूल : अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्यांनी 31 ऑगस्ट रोजी पूर्णपणे माघार घेत सैन्य अमेरिकेला परतल्यानंतर तालिबान्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढत पंजशीरच

2012 पूर्वीची नियुक्ती दाखवून शिक्षक भरतीत करोडोचा घोटाळा : जि.प. सदस्य वाकचौरेंचा दावा
संजीवनीचे 52 अभियंते एक्साईडच्या सेवेत दाखल ः अमित कोल्हे            
देशात महिला मतदारांची संख्या वाढली – मुख्य निवडणूक अधिकार राजीव कुमार

काबूल : अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्यांनी 31 ऑगस्ट रोजी पूर्णपणे माघार घेत सैन्य अमेरिकेला परतल्यानंतर तालिबान्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढत पंजशीरच्या खोर्‍याचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याचे दावे करणारा तालिबान पंजशीरवर हल्ले करत आहे. पंजशीर काबीज करण्यासाठी तालिबानकडून हरतर्‍हेचे प्रयत्न सुरू आहेत. पंजशीर प्रांतात घुसखोरीचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत. मात्र हल्ला करणार्‍या जवळपास 350 तालिबानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालून 40 पेक्षा अधिक दहशतवाद्यांना कैद केल्याची माहिती नॉर्दर्न अलायन्सने दिली आहे. ही कारवाई करताना नॉदर्न अलायन्सच्या हाती अमेरिकन वाहने आणि हत्यारे लागली आहेत.
यापूर्वी सोमवारी रात्री झालेल्या लढाईत सात ते आठ तालिबानींना कंठस्नान घातल्याचा दावा फहीम दाष्टी यांनी केला आहे. युद्ध आणि शांततेसाठी आम्ही तयार आहोत, असे पंजशीरमधल्या योद्ध्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे तालिबानला अन्य प्रांतांप्रमाणे पंजशीर सहजतेने मिळवता येणार नाही, हे आधीच स्पष्ट होते. तिथे घनघोर लढाईची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि आता सुरुवात त्या दिशेने होताना दिसत आहे. सोमवारी आणि मंगळवारी तालिबानने सातत्याने या भागावर हल्ले केले आहेत. हिंदकुश पर्वतरांगांमध्ये पंजशीर खोर आहे. निर्सगाने समृद्ध असलेला हा प्रदेश नॉर्दन अलायन्सचा बालेकिल्ला आहे. तालिबान तसेच रशियन फौजांना आतापर्यंत कधीही येथे विजय मिळवता आलेला नाही. उंच डोंगररांगा, अरुंद खोरे आणि पंजशीर नदीने दिलेलं नैसर्गिक संरक्षण यामुळे पंजशीरची लढाई तालिबानसाठी अवघड असेल. पंजशीर खोर्‍याकडे जाणार्‍या सगळ्या रस्त्यांवर देशभक्त तजाक फायटर्स तैनात आहेत.

पाकिस्तानी दहशतवाद्यांची जुलैमध्ये अफगाणिस्तानात प्रवेश
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्यात अखेरचे झालेले संभाषण समोर आले असून, त्यातून अनेक खुलासे झाले आहेत. हे संभाषण 23 जुलै रोजी झाले होते. यावेळी बोलतांना घनी यांनी सांगितले की, तालिबान व्यतिरिक्त, पाकिस्तानची संपूर्ण योजना त्यात सामील आहे, ते त्यांना समर्थन देत आहेत. त्यांनी 10-15 हजार आंतरराष्ट्रीय दहशतवादी येथे पाठवले आहेत. लष्करी परिस्थिती संतुलित असेल तेव्हाच आपल्याला शांतता मिळू शकेल असे घनी म्हणाले. त्यांनी सांगितले की, यासाठी ते चार मोठ्या शहरांमध्येही गेले आहेत. बायडेन यांनी घनी यांना माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांना सोबत घेण्याचा सल्ला दिला, ज्यावर घनी यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले. ते म्हणाले की, करझाई त्यांना (अशरफ घनी) अमेरिकेचा नोकर संबोधून हिणवत होते.

COMMENTS