Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहा महिन्यापासून वैद्यकीय अधिकारी वेतनापासून वंचित

मसूर / वार्ताहर : सातारा जिल्ह्यातील अनेक वैद्यकीय अधिकार्‍यांना गेल्या सहा महिन्यापासून वेतनच मिळाले नाही. त्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली असून थक

लोणंद मधील नव्या पाण्याच्या टाकीचे उदघाटन कुणासाठी थांबलय?
फलटण तालुक्यातील खाणीत परप्रांतियाचा मृत्यू
गुरुजींच्या डमीला हद्दपार करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शाळांमध्ये गुरूजींचे फोटो

मसूर / वार्ताहर : सातारा जिल्ह्यातील अनेक वैद्यकीय अधिकार्‍यांना गेल्या सहा महिन्यापासून वेतनच मिळाले नाही. त्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली असून थकीत वेतन त्वरित अदा करावे. यापुढे पाच तारखेपूर्वी वेतन मिळावे अन्यथा सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांवर बहिष्कार घातला जाईल. कामबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून कोविड 19 सारख्या महामारीच्या काळात प्रमाणापेक्षा अतिरिक्त कामकाजाचा ताण असल्याने वैद्यकीय अधिकारी अधिक मानसिक तणावाखाली आहेत. त्यातच वेतन वेळेत होत नसल्याने ते सद्यस्थितीत प्रचंड आर्थिक चणचण सहन करत आहेत. घराचे हप्ते, गाडीचे हप्ते, शाळा कॉलेज सुरू झाल्याने मुलांची फी या सर्व गोष्टींसाठी पैशाची पूर्तता होत नसल्याने हे सर्व कर्मचारी मानसिक तणावाखाली आहेत. वैद्यकीय अधिकारी यांच्या दरमहाच्या वेतनासंबंधी वरिष्ठ स्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत वेळोवेळी पाठपुरावा केला जात नाही. त्यामुळे दरमहाचे वेतन नियमित व वेळेत होत नाही. असेही निवेदनात म्हटले आहे. यापुढे जिल्हा आरोग्य अधिकारी सातारा यांनी या कामी विशेष लक्ष घालून योग्य ती कार्यालयीन कार्यवाही करावी. अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जाधव व सचिव डॉ. भगवान मोहिते यांच्या तर्फे देण्यात आला.

COMMENTS