Homeताज्या बातम्यादेश

’सीआयएसएफ’मध्ये अग्निवीरांसाठी 10 टक्के आरक्षण

नवी दिल्ली : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) माजी अग्निवीरांसाठी 10 टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलेय. काही दिवसांपूर्वी सीमा सुरक्षा दला

प्रोजेक्टचे रूपांतर प्रॉडक्टमध्ये व्हावे ः नितीनदादा कोल्हे
नगरमधील नव्या पत्रकारांना घरांसाठी जागा द्या ; डॉ. सोनवणेंची आ. जगतापांकडे मागणी
तिप्पट पैशाचे आमिष दाखवून मसूरच्या युवकांची 42 लाख रुपयांची फसवणूक

नवी दिल्ली : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) माजी अग्निवीरांसाठी 10 टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलेय. काही दिवसांपूर्वी सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) अशा प्रकारचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने सीआयएसएफ मधील रिक्त पदांच्या भरतीसाठी ही घोषणा केली.
केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निवीरांसाठी उच्च वयोमर्यादेतही शिथिलता जाहीर केली आहे. ते अग्निवीरांच्या पहिल्या बॅचच्या किंवा त्यानंतरच्या बॅचच्या आधारावर उपलब्ध असेल. यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कायदा, 1968 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की 10 टक्के पदे माजी सैनिकांसाठी राखीव असतील. माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचच्या उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा 5 वर्षांपर्यंत आणि इतर बॅचच्या उमेदवारांसाठी तीन वर्षांपर्यंत शिथिल केली जाईल. अधिसूचनेत म्हटले आहे की, माजी कर्मचार्‍यांनाही शारीरिक चाचणीतून सूट दिली जाईल, म्हणजेच त्यांना शारीरिक चाचणी द्यावी लागणार नाही. केंद्र सरकारने गेल्या वर्षी 14 जून रोजी लष्कर, नौदल आणि हवाई दलात 17 ते 21 वयोगटातील तरुणांच्या भरतीसाठी अग्निपथ योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत पहिल्या 4 वर्षांसाठी युवकांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाईल. या अंतर्गत सैन्यात भरती होणार्‍या सैनिकांना अग्निवीर म्हणून ओळखले जाईल. सरकारच्या घोषणेनुसार, अग्निपथ योजनेअंतर्गत 4 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक बॅचमधील 25 टक्के अग्निवीरांना नियमित सेवा दिली जाईल. यासाठी अग्निवीरांना परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागेल. अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर, गृह मंत्रालयाने सांगितले होते की केंद्रीय निमलष्करी दल आणि आसाम रायफल्समधील 10 टक्के रिक्त जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव असतील. सध्या निमलष्करी दलात भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 23 वर्षे आहे. माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचच्या उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा 5 वर्षांपर्यंत आणि इतर बॅचच्या उमेदवारांसाठी तीन वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली.

COMMENTS