Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड-बिदर आणि बोधन-लातूर रेल्वे प्रकल्पांना गती द्या; राज्यसभेत डॉ. अजित गोपछडे यांची मराठवाड्यातील प्रलंबित प्रकल्पांवर जोरदार मागणी

नांदेड : महाराष्ट्र आणि कर्नाटकला रेल्वे मार्गाने जोडणार्‍या महत्त्वाकांक्षी नांदेड-देगलूर-बिदर तसेच बोधन-बिलोली-नरसी-मुखेड-लातूर रोड या रेल्वे प

पुत्रकामेष्टी यज्ञातून अवतरले श्रीराम : ह.भ.प. योगेश महाराज नेरलकर यांचे प्रभावी कीर्तन; हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये साई गणेश मंदिरात पार पडला श्रीराम जन्मोत्सव
रेती लिलावधारकांनी शासनाची फसवणूक; कारवाईची मागणीशिंपाळकर यांचे निवेदन
अफवांना पूर्णविराम : नांदेड जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा; नागरिकांनी घाबरू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड : महाराष्ट्र आणि कर्नाटकला रेल्वे मार्गाने जोडणार्‍या महत्त्वाकांक्षी नांदेड-देगलूर-बिदर तसेच बोधन-बिलोली-नरसी-मुखेड-लातूर रोड या रेल्वे प्रकल्पांना तातडीने गती देण्यात यावी, अशी मागणी राज्यसभेत डॉ. अजित गोपछडे यांनी केली. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील विविध प्रलंबित रेल्वे प्रश्नांवरही सभागृहाचे लक्ष वेधले.
सभागृहात बोलताना त्यांनी सांगितले की, नांदेड-देगलूर-बिदर या नव्या रेल्वेमार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (ऊझठ) तयार झाला असून महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पासाठी 50 टक्के आर्थिक सहभागाची तयारी दर्शवली आहे. केंद्र सरकारने कर्नाटक व तेलंगणा सरकारशी समन्वय साधून या प्रकल्पाला प्राधान्याने पुढे न्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. हा रेल्वेमार्ग उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा महत्त्वाचा संपर्क दुवा ठरू शकतो. यामुळे प्रवासाचे अंतर सुमारे 150 किलोमीटरने कमी होऊन बेंगळुरू सारख्या आयटी केंद्र आणि नागपूर या औद्योगिक शहरादरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. तसेच, नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर फाइव्ह स्टार एमआयडीसीला या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळून औद्योगिक गुंतवणूक वाढेल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असेही त्यांनी नमूद केले. याशिवाय बोधन-बिलोली-नरसी-मुखेड-लातूर रोड या नव्या रेल्वेमार्गाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळालेली असून ते वेळेत पूर्ण करून लवकरात लवकर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

COMMENTS