मुंबई / प्रतिनिधी : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जपान ओपन सुपर 750 स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी करत कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा
मुंबई / प्रतिनिधी : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जपान ओपन सुपर 750 स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी करत कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा विजय मिळवला आहे. अंतिम फेरीत तिने जपानच्या आणि माजी विश्वविजेत्या अकेन यामागुचीचा सरळ सेटमध्ये 21-17, 21-17 असा पराभव करत जेतेपद पटकावले. या विजयासह सिंधू जपान ओपनचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
सिंधूसाठी हा विजय केवळ एक ट्रॉफी नसून पुनरागमनाची नांदी आहे. डिसेंबर 2024 मधील ’सैयद मोदी इंटरनॅशनल’ स्पर्धेनंतर बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरवरील हे तिचे पहिलेच विजेतेपद आहे. त्याहूनही महत्वाचे म्हणजे सन 2019 च्या बॅसल विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर मिळालेली ही तिची पहिलीच मोठी सुपर 750 पातळीवरील ट्रॉफी आहे. त्यामुळे एका मोठ्या विजेतेपदासाठीची तिची 7 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आज संपली आहे. उपांत्य सामन्यात सिंधू 21-19, 15-10 अशी आघाडीवर होती. त्या वेळी तिची प्रतिस्पर्धी चेन युफेई (चीन) हिने दुखापतीमुळे माघार घेतली.
अंतिम सामना सिंधूसाठी सोपा नव्हता. कारण आकडेवारी तिच्या विरोधात होती. याआधी सिंधू आणि यामागुची यांच्यात एकूण 24 सामने झाले होते, ज्यात यामागुचीचे 14-10 असे वर्चस्व होते. विशेष म्हणजे गेल्या सहा लढतींपैकी पाच वेळा यामागुचीने सिंधूला हरवले होते. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत असूनही यामागुचीवर मात करणे सोपे नव्हते. मात्र, आज सिंधूने पूर्णपणे वेगळी रणनीती आखली. पहिल्या सेटपासूनच तिने वेगवान स्मॅश आणि नेटजवळील अचूक शॉट्सच्या जोरावर यामागुचीला ब्रकफूटला ढकलले. दोन्ही सेटमध्ये तिने 21-17 अशा समान फरकाने विजय मिळवला आणि एकही सेट गमावला नाही.
या विजयामुळे सिंधूचा जागतिक क्रमवारीत मोठा फायदा होणार आहे. गेल्या काही वर्षात दुखापती आणि फॉर्मअभावी तिला संघर्ष करावा लागला होता. पण जपान ओपनमधील या विजयाने तिचा आत्मविश्वास पुन्हा उंचावला आहे. येत्या जागतिक अजिंक्यपद आणि ऑलिम्पिकच्या दृष्टीने हा विजय तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो. सिंधूच्या या ऐतिहासिक विजयामुळे देशातील तरुण खेळाडूंना नक्कीच प्रेरणा मिळेल.

COMMENTS