Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचार्‍याची हत्या

नागपूर : शहरातील वानाडोंगरी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागपूरकर हादरले आहेत. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचार्‍याला जाब विचारल्याच्या

नागपुरात 18 जुलैला उद्धव ठाकरेंचे ‘रामरक्षा’ आंदोलनमुख्यमंत्री फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शनाची तयारी
सत्तेची खूर्ची कायमस्वरूपी नसते; केंद्रीय मंत्री गडकरींनी टोचले कार्यकर्त्यांचे कान
नागपुरात स्कूल बसचा अपघात

नागपूर : शहरातील वानाडोंगरी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागपूरकर हादरले आहेत. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचार्‍याला जाब विचारल्याच्या रागातून टवाळखोरांनी जीवघेणा हल्ला करून ठार मारल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस दलातही मोठी खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या मातोश्री नगर येथे राहणारे पंकज ठाकूर हे पोलीस कर्मचारी होते. परिसरात संशयास्पदरीत्या फिरणार्‍या काही तरुणांना त्यांनी जाब विचारला होता. याच कारणावरून संबंधित तरुणांनी वैयक्तिक वैर धरत सूड उगवण्याचा कट रचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशी दुपारी ठाकूर यांनी आकाश मंडल या स्थानिक तरुणाला घराजवळ वारंवार फिरण्याबाबत विचारणा केली होती. या वादातून निर्माण झालेल्या रागातून रात्री साडेदहाच्या सुमारास आकाश मंडल व त्याच्या साथीदारांनी ठाकूर यांच्यावर हल्ला चढवला. लोखंडी सळीने छातीवर वार केल्यामुळे ठाकूर गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात ठाकूर यांच्या काही नातेवाईकांनाही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर पोलीसांनी तातडीने तपास सुरू केला असून मुख्य आरोपी आकाश मंडल याच्यासह इतर सहभागींचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.

COMMENTS