Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी 55 लाखांचा मुद्देमाल जप्त

भोकर : भोकर तालुक्यातील कोंडदेवनगर शिवारात सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननावर भोकर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 55 लाख 3 हजार 500 रुपयांचा मुद

नांदेड-बिदर आणि बोधन-लातूर रेल्वे प्रकल्पांना गती द्या; राज्यसभेत डॉ. अजित गोपछडे यांची मराठवाड्यातील प्रलंबित प्रकल्पांवर जोरदार मागणी
पुत्रकामेष्टी यज्ञातून अवतरले श्रीराम : ह.भ.प. योगेश महाराज नेरलकर यांचे प्रभावी कीर्तन; हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये साई गणेश मंदिरात पार पडला श्रीराम जन्मोत्सव
एनजीटीचा महापालिकेला दणका; गोदावरी प्रदूषणप्रकरणी प्रशासनाला कडक आदेश

भोकर : भोकर तालुक्यातील कोंडदेवनगर शिवारात सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननावर भोकर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 55 लाख 3 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंडदेवनगर लगतच्या गायरान जमिनीवर बेकायदेशीररीत्या मुरूम उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा होताच त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले. दि. 25 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 1.15 वाजता पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता, जेसीबीच्या साहाय्याने मुरूम उत्खनन करून तो टिप्पर (क्र. एम एच- 26 -सी एच 2438) मध्ये भरला जात असल्याचे आढळून आले. संबंधितांकडे कोणतेही वैध परवाने अथवा रॉयल्टीची कागदपत्रे नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कारवाईत पोलिसांनी जेसीबी मशीन (अंदाजे किंमत 35 लाख रुपये) टाटा कंपनीचा टिप्पर (अंदाजे किंमत 20 लाख रुपये) सुमारे 3 ब्रास मुरूम असा एकूण 55 लाख 3 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त केला. या प्रकरणी जेसीबी चालक जगदीश मुकेश शर्मा व टिप्पर मालक स्वप्निल दिगंबर झपाटे यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तसेच जेसीबी मालक पेटाजी पुंडलिक पेंडलवार यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोकर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 150/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48(7), (8) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली  सो पो नी शैलेंद्र ओटे , सोनाजी कानगुले, राजेश घुन्नर पोलीस कर्मचारी राजेश्वर कवळे करीत आहेत.

COMMENTS