Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निखिल लातूरकर यांच्या पुढाकारातून प्रथमेशच्या वैद्यकीय शिक्षणाच्या स्वप्नांना बळ; कॅप्टन आशिष दामले यांची एक लाखांची मदत

जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची ओढ असेल तर समाजही मदतीचा हात पुढे करतो, याचे प्रेरणादायी उदाहरण  नांदेडमध्ये पाहायला मिळाले. आर्थिक अडचणींशी झुंज देत

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात नगरसेविका मीनल पाटलांचे बेरजेचे राजकारण!
जलतरणीकेत ‘अनधिकृत वसुली’चा खेळ; नांदेड महापालिकेची प्रतिमा पुन्हा धोक्यात
बसवेश्वर जयंतीच्या बॅनरमधून भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर ; परशुराम जयंतीकडे मात्र काही नेत्यांचा कानाडोळा ?



जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची ओढ असेल तर समाजही मदतीचा हात पुढे करतो, याचे प्रेरणादायी उदाहरण  नांदेडमध्ये पाहायला मिळाले. आर्थिक अडचणींशी झुंज देत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्रथमेश शशिकांत देशमुख या विद्यार्थ्यास परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी स्वतःच्या पुढाकारातून एक लाख रुपयांची आर्थिक मदत नांदेडला पत्रकारांच्या उपस्थितीत दिली. या मदतीमुळे प्रथमेशच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नांना नवे बळ मिळाले आहे.
प्रथमेश शशिकांत देशमुख हा सध्या एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून अत्यंत जिद्दीने आपला शैक्षणिक प्रवास सुरू ठेवला आहे. त्याचे वडील शशिकांत देशमुख हे पुण्यनगरीमध्ये डीटीपी ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. अल्प उत्पन्नात कुटुंबाचा गाडा ओढत असतानाच काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट अधिक गडद झाले. अशा कठीण परिस्थितीत प्रथमेशचे शिक्षण थांबू नये, त्याच्या गुणवत्तेला योग्य दिशा मिळावी आणि समाजाने अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहावे, या भावनेतून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी पुढाकार घेत विविध स्तरांवर मदतीचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत गेला आणि अनेक दानशूर व्यक्ती पुढे आल्या. एमबीबीएस शिक्षणासाठी प्रथमेशला दरवर्षी सुमारे आठ लाख रुपयांचा खर्च येत असल्याने समाजातून आर्थिक सहकार्य उभे करण्यासाठी पत्रकार कृष्णा उमरीकर आणि पत्रकार रमेश पांडे यांनीही विशेष प्रयत्न केले. समाजातील अनेक संवेदनशील व्यक्तींना आवाहन करून त्यांनी मदतीची साखळी निर्माण केली. कॅप्टन आशिष दामले यांनी दिलेल्या एक लक्ष रुपयाच्या आर्थिक मदतीचा धनादेश प्रथमेशचे वडील शशिकांत देशमुख यांना प्रदान करण्यात आला. यावेळी नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार  विजय जोशी,  संतोष कुलकर्णी, बजरंग शुक्ला,  किरण कुलकर्णी, रमेश देवडे,  प्रशांत गवळी, प्रल्हाद कांबळे,  कृष्णा उमरीकर, संतोष क्षिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना योग्य वेळी मदत मिळाली तर तेच विद्यार्थी उद्या समाजसेवेचे नवे आदर्श निर्माण करतात. प्रथमेशच्या रूपाने उद्याचा एक संवेदनशील डॉक्टर घडत असून, त्यासाठी उभा राहिलेला हा मदतीचा हात समाजातील ऐक्य, करुणा आणि शिक्षणनिष्ठेचा जिवंत संदेश देणारा ठरला आहे.

COMMENTS