Homeताज्या बातम्या

कर्जमाफी व पीक विम्याच्या प्रश्नांवर कृषी मंत्र्यांना जाब-नुमान चाऊसशेतकर्‍यांच्या हक्कांसाठी मौलाना आझाद युवा मंचचे कृषी मंत्र्यांना निवेदन

माजलगाव : राज्याचे कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या माजलगाव दौर्‍यादरम्यान मौलाना आझाद युवा मंचचे बीड जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊ

शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखला कांद्याला भाव नसल्याने  कांदा उत्पादक आक्रमक  
बळीराजाला मोठा दिलासा; शेतकरी कर्जमाफीची घोषणा
कर्जमाफीच्या जीआरची होळी! जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांचा सरकारविरोधात तीव्र आक्रोश, सरसकट कर्जमाफीची मागणी!


माजलगाव : राज्याचे कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या माजलगाव दौर्‍यादरम्यान मौलाना आझाद युवा मंचचे बीड जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी शेतकर्‍यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर केले.
यावेळी सरसकट विना अट रु. 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठीचे रु. 50 हजारांचे अनुदान वाढवून रु. 1 लाख करणे, तसेच पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात रु. 17,500 प्रति हेक्टर पीक विमा मदत तात्काळ जमा करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. बीड जिल्ह्यातील अनेक शेतकरी कर्जमाफी व पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहिल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याचे यावेळी चाऊस यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगत संबंधित मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

COMMENTS