Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजितदादांचे विमान कोसळण्यापूर्वी झाडाला धडकले

नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या प्राथमिक अहवालातून स्पष्टमुंबई ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान दुर्घटनेला एक महिना पूर्ण होत अस

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नगरसेवक बनसोडे यांच्याकडून सत्कार
उप अभियंता संजय भेंडेंचा 250 कोटींच्या निधीचा घोटाळा; यापूर्वी झालेल्या कामांवरच निधी खर्च दाखवत काढले बिले; शाखा अभियंता शिर्के आणि बकरे यांचा संगनमताने अपहार
राज्यकर्त्यांचा साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप नको

नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट
मुंबई ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान दुर्घटनेला एक महिना पूर्ण होत असताना या घटनेबाबतचा प्राथमिक तपास अहवाल प्रसिद्ध झाला आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने सादर केलेल्या बावीस पानी अहवालातून विमान कोसळण्यापूर्वी झाडाला धडकल्याचे समोर आले आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके तांत्रिक कारण अद्याप निश्‍चित झालेले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गत 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ ही दुर्घटना घडली होती. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. आता प्राथमिक अहवालातून काही घटनाक्रम स्पष्ट झाला आहे. अहवालानुसार, विमानाचा समतोल बिघडल्याने ते प्रथम एका मोठ्या झाडाला धडकले. त्यानंतर ते वेगाने जमिनीवर कोसळले. अपघाताच्या वेळी परिसरात सुमारे दोन हजार मीटर इतकी दृश्यमानता होती, असे नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच हवामान पूर्णपणे प्रतिकूल नव्हते, असे प्राथमिक निरीक्षणातून दिसते. या दुर्घटनेत विमानातील उड्डाण माहिती नोंदवणारी यंत्रणा आणि वैमानिक कक्षातील संभाषण नोंदवणारी प्रणाली मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहे. विशेषतः तीव्र उष्णतेमुळे उड्डाण माहिती नोंदवणारे उपकरण खराब झाले असून त्यातील माहिती मिळवण्यात अडचणी येत आहेत. तथापि, मूळ तांत्रिक माहिती सुरक्षितरीत्या उतरवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या नोंदींचे सखोल विश्‍लेषण करण्यासाठी संबंधित परदेशी निर्मात्या कंपनीच्या तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ पथक भारतात येणार असून वैमानिक आणि हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणा यांच्यातील शेवटच्या क्षणांतील संभाषण व तांत्रिक तपशील उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सध्या जाहीर झालेला अहवाल हा केवळ प्राथमिक स्वरूपाचा असून त्यात संपूर्ण तांत्रिक विश्‍लेषणाचा समावेश नाही. तपास यंत्रणांकडून माहितीचे बारकाईने परीक्षण सुरू आहे. त्यामुळे अपघातामागील अचूक कारण स्पष्ट करणारा अंतिम अहवाल येण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS