Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संसदरत्न खा.अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत ॲड.प्रतापराव ढाकणे सुरु केलेल्या युवा संवाद अभियानाचा सोमवारी युवा संवाद अभियानाचा समारोप

पाथर्डी प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड.प्रतापराव ढाकणे यांनी महिनाभरापासून सुरु केलेल्या युवा संवाद अभियानाचा उद्या सोमवारी (२९जा

शिरुरमधून डॉ. कोल्हेच लढणार लोकसभा
अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मंजुरी द्या – खासदार डॉ. अमोल कोल्हे
भाजप प्रवेशाच्या चर्चांवर मौन सोडताना अमोल कोल्हेंचं सूचक भाष्य

पाथर्डी प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड.प्रतापराव ढाकणे यांनी महिनाभरापासून सुरु केलेल्या युवा संवाद अभियानाचा उद्या सोमवारी (२९जानेवारी) रोजी सकाळी ११ वा.खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत पाथर्डी येथे समारोप होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष महारूद्र किर्तने व युवक शहराध्यक्ष देवा पवार यांनी दिली.

      अधिक माहीती देताना किर्तने व पवार म्हणाले,ॲड.प्रतापराव ढाकणे यांनी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील महाविद्यालयात जात महाविद्यालयीन तरूण तरूणींशी संवाद साधला महाराष्ट्रातील व देशातील आजची राजकिय, समाजीक,शैक्षणिक परिस्थिती आणि त्याचा भविष्यात होणारे परिणाम या सर्व घडामोडीमुळे आजचे विद्यार्थी जेंव्हा व्यावसायिक जीवणात पदार्पन करतील त्यावेळी त्यांचेसमोरील संभाव्य समस्यांचा उहापोह ढाकणे यांनी महिन्याभरात केला.आज वाढती बेरोजगारी, शासकिय नोकर भरतीतील सावळा गोंधळ यामुळे तरूण व तरूणींमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली दिसते. याच सर्व समस्यांना वाचा फोडण्यासाठी ॲड.प्रतापराव ढाकणे दोन्ही तालुक्यातील जवळपास चाळीस महाविद्यालयातील हजारो विद्यार्थांशी संवाद साधला.याला प्रचंड प्रतिसाद लाभला या आभियानाच्या समारोपासाठी व तरूणांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांचे मार्गदर्शन पाथर्डी शहरातील ओपन थिएटर येथे सोमवारी ११ वाजता  “युवा महासंवाद” समारोप सोहळा आयोजीत करण्यात आला असून सर्वांनी यासाठी उपस्थित रहावे असे अवाहन शेवटी किर्तने व पवार यांनी केले.

COMMENTS