विविधरंगी गणेशमूर्तींनी सजल्या नेवासा येथील बाजारपेठा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विविधरंगी गणेशमूर्तींनी सजल्या नेवासा येथील बाजारपेठा

नेवासा फाटा प्रतिनिधी  महापूर, कोरोनासारख्या नकारात्मक बाबींचा ताण मागे सारून भक्तांना आपल्या भक्तीत दंग करणाऱ्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आम

नेवासा येथे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
हॉटेल चालकांचा प्रामाणिकपणा, हॉटेलमध्ये विसरलेले ५ तोळे सोन्यासह २० हजाराची रोख रक्कम केली परत
दिगंबरा..दिगंबरा श्रीपाद वल्लभ..दिगंबरा..चा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी करत देवगड दत्त मंदिर भाविकांसाठी खुले

नेवासा फाटा प्रतिनिधी 

महापूर, कोरोनासारख्या नकारात्मक बाबींचा ताण मागे सारून भक्तांना आपल्या भक्तीत दंग करणाऱ्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आमगनाला आता फक्त एक दिवस राहिल्याने बाजारपेठेत सजावट व पूजेच्या साहित्य खरेदीला उधाण आले आहे. दिवाळीनंतर तब्बल आठ महिन्यांनी रस्त्यावर एवढी गर्दी आणि नागरिक व बाजारपेठेत अमाप उत्साह दिसून आला. दुसरीकडे घराघरांत आरासाच्या मांडणीची लगबग सुरू आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत लाडक्या गणपती बाप्पांचा गणेशोत्सव उद्या शुक्रवारपासून सुरू होत आहे. बाप्पांच्या आगमनासाठी एक दिवस राहिल्याने आता बाजारपेठेत मखर, आसन, विद्युतमाळा, झुरमुळ्या, फुलांच्या माळा, वेली, झुंबर, तोरण, पडदे अशा साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. शहरातील  प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी आहे ,तर नेवासा फाटा येथील आंबेडकर चौक ,राजमुद्रा चौक येथे पूजेच्या साहित्यांची रेलचेल आहे. त्यामुळे  रस्त्यांवर वाहनांची मोठी वर्दळ आहे. महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे.

दुसरीकडे घराघरांत सजावट, आरासाच्या साहित्यांची मांडणी सुरू झाली आहे. गेल्यावर्षी सांभाळून, जपून ठेवलेले सजावटीचे साहित्य काढून ते स्वच्छ करणे, त्यातील खराब झालेले साहित्य बाजूला काढून यंदाची आरास कशी करायची यावर चर्चा सुरू आहे. काही घरांमध्ये तर मांडणीही पूर्ण झाली आहे.

सूचनांचे पालन करा : प्रशासनाचे आवाहन.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा, प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचना, आदेशांचे पालन करून सहकार्य करा, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे.  आगमन व विसर्जन मिरवणुकांवर बंदी आहे तसेच या काळात ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS