Homeताज्या बातम्या

कर्जमाफी पात्र शेतकर्‍यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे; नुमान चाऊस यांचे आवाहन

बीड: महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र शेतकर्‍यांनी यादीत आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरण व ग

‘एफ’ ग्रेड कायम असलेल्या ७ महाविद्यालयांतील पीजी प्रवेश स्थगित; २२ महाविद्यालयांना मोठा दिलासा
पेपरफुटीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बीडमध्ये धरणे आंदोलन; धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा- राजेंद्र मस्के
विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज कशासाठी?

बीड: महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र शेतकर्‍यांनी यादीत आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरण व ग्रीस्टॅक (GreeStack) नोंदणी तात्काळ पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन मौलाना आझाद युवा मंचचे बीड जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी केले आहे.

पात्र शेतकर्‍यांनी आधार कार्ड, कर्ज खाते व बचत खात्याचे पासबुक आणि आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच सेवा केंद्र संचालकांनी शेतकर्‍यांची पिळवणूक न करता त्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करावे आणि विनाकारण त्रास देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यातील कोणत्याही भागात आधार प्रमाणीकरण, ग्रीस्टॅक नोंदणी किंवा कर्जमाफी प्रक्रियेसंदर्भात अडचण आल्यास शेतकरी बांधवांनी मौलाना आझाद युवा मंचच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क साधावा. मंचाचे पदाधिकारी त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करतील, असेही नुमान अली चाऊस यांनी स्पष्ट केले.

COMMENTS