Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छ.संभाजीनगरमध्ये तरूणीची भरदिवसा हत्या

छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरात प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादाचे भयावह रूप समोर आले असून, एका तरुणीची भरदिवसा हत्या झा

महिला पोलिसाला मारहाण
देशद्रोह प्रकरणात रामपालला जामीन
केजमध्ये ग्राम महसूल अधिकारी लाचलुचपत पथकाच्या जाळ्यातवारसाचा फेर घेण्यासाठी मागितली 39 हजारांची लाच

छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरात प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादाचे भयावह रूप समोर आले असून, एका तरुणीची भरदिवसा हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर-जालना मार्गावरील शिवसमर्थ इंधन पंपावर कार्यरत असलेली पूजा सुदाम गावंडे (वय 27, मूळ रा. चित्तेपिंपळगाव, सध्या मुक्काम कुंभेफळ) ही गुरुवारी दुपारी आपली कामाची जबाबदारी पार पाडत होती. याच वेळी सत्यम रावसाहेब गावंडे (वय 32) हा दुचाकीवरून तेथे आला. काही क्षणांतच त्याने धारदार शस्त्राने पूजावर हल्ला चढवला. गळ्यावर वार झाल्याने पूजा रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना पंपावरील निगराणी कॅमेर्‍यात नोंदली गेली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. भरदिवसा, वर्दळीच्या मार्गावरील या ठिकाणी घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, पूजा आणि सत्यम यांच्यात प्रेमसंबंध होते. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये मतभेद वाढल्याची माहिती समोर येत आहे. या वादातूनच आरोपीने संतापाच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.

COMMENTS