Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारामती, राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; काँगे्रसची बारामतीत माघार, मात्र कोणत्याच उमेदवारांना पाठिंबा नाही

अहिल्यानगर/पुणे : राज्यातील बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होत असून, दोन्ही मतदारसंघामध्येे पोटनिवडणूक बिनविरोध होण

राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी
बाणेश्वर विद्यालयातील गुणवंतांचा आ. कर्डिलेंकडून सन्मान
राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन्स 2026 पुरस्कार सोहळ्याचे अहिल्यानगर येथे आयोजनविविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार राज्यस्तरीय गौरव

अहिल्यानगर/पुणे : राज्यातील बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होत असून, दोन्ही मतदारसंघामध्येे पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू होते. बारामतीतून काँगे्रसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतली असल्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेेत्रा पवार यांचा मार्ग सुकर झाला, मात्र राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले यांच्याविरोधात शरद पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीवे संतोष चोळके यांच्यासह इतर 5 अपक्ष उमेदवार मैदानात असल्यामुळे याठिकाणी निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, बारामती मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी खासदार शरद पवार यांनी थेट काँगे्रसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना फोन करून काँगे्रस उमेदवाराने माघार घेण्याची मागणी केली, त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून उमेदवार मागे घेण्याची विनंती केली, तसेच आमदार रोहित पवारांनी सपकाळ यांची भेट घेतली होती, त्यानंतर काँगे्रसने आपला उमेदवार आकाश मोरे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले, त्यानुसार मोरे यांनी माघार घेतली. मात्र काँगे्रसने माघार घेतली असली तरी, सुनेत्रा पवारांसह कोणत्याच उमेदवाराला पाठिंबा दिला नाही. बारामतीत एकूण 53 उमेदवारांचे अर्ज कायम होते. यापैकी 30 उमेदवारांनी माघार घेतली असली तरी अद्याप 23 उमेदवार हे रिंगणात कायम आहेत. तर राहुरीत एकूण 7 उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे बारामती आणि राहुरीत बिनविरोध निवडणूक होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. मात्र बारामतीत काँग्रेस पक्षाच्या माघारीमुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा तर राहुरीत प्राजक्त तनपुरे यांच्या माघारीमुळे सत्ताधारी पक्षाच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुखकर होतांना दिसून येत आहे.

प्राजक्त तनपुरे नेमकी कुणाला साथ देणार ?
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवार यांच्या पक्षाकडून राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याची असमर्थतता दाखवत माघार घेतली. मात्र तरीही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँगे्रसने आपला दुसरा उमेदवार दिला आहे. तसेच माघार न घेतल्यामुळे ही निवडणूक होणार आहे. अशावेळी तनपुरे भाजपचा प्रचार करणार की, शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार, याबाबत त्यांच्या मनात द्विधा परिस्थिती असली तरी, ते नेमकी काय भूमिका घेतात, हे पुढील काही दिवसांच स्पष्ट होणार आहे. त्यांनी भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत धुडकावून लावले असले तरी, आत्ता त्यांच्यासमोर मात्र द्धिधा संकट उभे असल्याचे दिसून येत आहे.

पार्थ पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची दिलगिरी
आमदार रोहित पवार यांनी खा. पार्थ पवार यांनी काँगे्रसबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. काँग्रेस हा स्वतंत्र विचारांचा पक्ष असल्याचे नमूद करत रोहित पवार यांनी पुन्हा एकदा माघारीची विनंती केली होती, त्यासाठी त्यांनी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली होती.

COMMENTS