Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार

मराठा आंदोलक संगीता वानखेडेंचे गंभीर आरोप

मुंबई ः मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करत सरकारची अनेकवेळेस जरांगे यांनी कोंडी केली होती.

आरक्षणप्रश्‍नी महाराष्ट्र पिंजून काढणार ः मनोज जरांगे
…तर, विधानसभेच्या 288 जागा लढवणार : मनोज जरांगे
मनोज जरांगेंचं आजपासून आमरण उपोषण सुरु

मुंबई ः मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करत सरकारची अनेकवेळेस जरांगे यांनी कोंडी केली होती. मात्र आता अजय महाराज बारसकर यांच्यानंतर मराठा आंदोलक महिला संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा दावा केला आहे.
मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला वेड्यात काढले. दंगल का घडली? मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात आहे असाही दावा संगीता वानखेडेंनी केला. संगीता वानखेडे या मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलनात कार्यरत होत्या. मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर फारकत घेतल्यानंतर संगीता वानखेडेंनी त्यांच्यावर टीका केली आहे आणि आरोप केले आहेत. महाराष्ट्राला मनोज जरांगेंनी वेड्यात काढले आहे. त्यांचे सुरुवातीपासून चुकतच आले आहे. सरकारने दंगल घडली की घडवली त्याचा शोध घेतला पाहिजे. पोलिसांनी जो लाठीचार्ज झाला तेव्हा महाराष्ट्राचा उद्रेक दिसला. मनोज जरांगे पाटील कोण हे आधी मीडियाला माहीत नव्हते. लाठीचार्ज झाल्यानंतर त्यांना डोक्यावर घेतले. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार सगळे त्यांना भेटले. त्यानंतर मनोज जरांगेंना लोकांनी डोक्यावर घेतले. त्यामुळेच मी त्यांच्याशी जोडले होते. मनोज जरांगे साधासुधा माणूस, आपल्या भाषेत बोलणारा माणूस म्हणून महाराष्ट्राने आणि मी विश्‍वास ठेवला होता. मी एक महिन्यापूर्वी पर्यंत त्यांच्यासह होते. पण आता मी त्यांच्यासोबत नसल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे. नामदेवराव जाधव यांच्यावर शाईफेक झाली तेव्हाही मनोज जरांगे यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मंगेश साबळे कोण हे माहीत नाही असे सांगितले. मी या मनोज जरांगेची बाजू घेऊन भुजबळांना ट्रोल केले. मात्र माझ्याविषयी गलिच्छ भाषा वापरण्यात आली. मी तळतळीने बोलत होते. त्यावेळी मला फोन आले, फेसबुकवर फोन आले. संगीता वानखेडेला एकटी समजू नका इतकेच बोलत होते. मात्र या बाबाचे वक्तव्य होते की मी त्या बाईला बोलायला सांगितले नव्हते. मला ती बाब खटकली, मला तेव्हा खूप मनस्ताप झाला. मी रेकॉर्डिंग ऐकले आहे त्यामुळे मी हे बोलते आहे. मनोज जरांगेंची गडबड आहे हे मलाही कळत होते. त्यामुळे मी साथ सोडल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे.  

COMMENTS