सनफार्मा आगीतील दोषींवर गुन्हे दाखल करा- मंत्री कड़ू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सनफार्मा आगीतील दोषींवर गुन्हे दाखल करा- मंत्री कड़ू

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगरच्या एमआयडीसीतील सनफार्मा कंपनीतील आगीच्या घटनेत ज्या कोणी यंत्रणा दोषी असेल, त्या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश कामगा

हाच नियम लोकप्रतिनिधींनाही लावा – नगराध्यक्ष वहाडणे
व्यावसायिकाने पत्नीची हत्या करून केली आत्महत्या
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या की घातपात ?

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगरच्या एमआयडीसीतील सनफार्मा कंपनीतील आगीच्या घटनेत ज्या कोणी यंत्रणा दोषी असेल, त्या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एमआयडीसी प्राधिकरणास दिले. तसेच या पुढील काळात अशा घटना घडू नयेत म्हणून कंपनीला सक्त ताकीद द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री कडू यांनी नुकतीच सन फार्मा कंपनीस भेट देऊन तेथे लागलेल्या आगीसंदर्भात कारवाईचे आदेश दिले. यावेळी त्यांनी पोलिस व कंपनी प्रशासनाला सूचना दिल्या. कंपनीत याअगोदर आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कंपनीतील आपत्ती व्यवस्थापन प्रणालीवर प्रश्‍न उपस्थित होत आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्री कडू यांनी सनफार्मा कंपनीमध्ये घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ते म्हणाले की, या घटनेला ज्या कोणी यंत्रणा दोषी असेल, त्या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत असे आदेश त्यांनी एमआयडीसी प्राधिकरणास दिले. तसेच या पुढील काळात अशा घटना घडू नयेत म्हणून कंपनीला सक्त ताकीद द्यावी. आग प्रतिबंध करण्यासाठी जेवढ्या यंत्रणा आहेत, त्या बसविण्याच्या उपाययोजना कराव्यात. या आगीतील घटनेमध्ये कंपनीचे कर्मचारी रावसाहेब माघाडे यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत,असेही त्यांनी सांगितले. सनफार्मा कंपनीतील लोडिंग-अनलोडिंग यार्डमध्ये बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास केमिकल सॉल्वंटला आग लागली. आग लागल्याचे समजताच कंपनीच्या व्यवस्थापक व कर्मचार्‍यांनी तात्काळ एमआयडीसी अग्निशमन विभाग व महापालिका अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन विभागाचे 2 व महापालिका अग्निशमन विभागाचे 2, राहुरी नगर परिषदेचा एक असे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला होता. मात्र, या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेला महिना पूर्ण होताच एमआयडीसीत असलेल्या सनफार्मा कंपनीत आग लागल्याने नगरमध्ये खळबळ उडाली. या पार्श्‍वभूमीवर मंत्री कडू यांनी या आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

COMMENTS