Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

करार पूर्ण होईपर्यंत सैन्य इराणमध्ये तैनात; ट्रम्प यांचा इशारा ; युद्धविरामच्या तीन अटी मोडल्याचा इराणचा आरोप

तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत झालेल्या युद्धविराम कराराबाबत ठाम भूमिका व्यक्त करत, कराराची पूर्ण अंमल

अमेरिकेचा दुटप्पी डाव घातक! मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग; शांततेच्या नावाखाली लष्करी हस्तक्षेप
अमेरिका-इराण करार अंतिम टप्प्यात; पश्चिम आशियात लवकरच शांततेची नवी चाहूल
कोणत्याही स्वरूपातील दहशतवाद मान्य नाही; भारताने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला सुनावले

तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत झालेल्या युद्धविराम कराराबाबत ठाम भूमिका व्यक्त करत, कराराची पूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत अमेरिकन सैन्य इराणच्या आसपास तैनात ठेवण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. कराराचे उल्लंघन झाल्यास संघर्ष पुन्हा भडकू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरील संदेशातून सांगितले की, परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी कोणतीही ढिलाई परवडणारी नाही. करार पाळला गेला नाही, तर यापूर्वीपेक्षा अधिक व्यापक आणि विध्वंसक संघर्ष उद्भवू शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र, अशी वेळ येण्याची शक्यता कमी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
इराणकडून अमेरिकेवर युद्धविरामाच्या तीन प्रमुख अटी मोडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. इराणचे नेते मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने दहा कलमी प्रस्तावातील मूलभूत अटींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे वाटाघाटींचा पाया डळमळीत झाला असून, सध्याच्या परिस्थितीत पुढील चर्चा अर्थहीन ठरत असल्याचे इराणने स्पष्ट केले. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणार्‍या तेलवाहू जहाजांवर प्रति बॅरल एक डॉलर शुल्क आकारण्याची योजना आखल्याची माहिती समोर आली आहे. या मार्गावरून जाणार्‍या जहाजांवर कडक देखरेख ठेवली जाणार असून, जहाजांना त्यांच्या मालाची माहिती आधी सादर करावी लागणार आहे. त्यानंतरच पुढील प्रवासाला परवानगी दिली जाईल. इराणचे अधिकारी हमीद हुसैनी यांनी सांगितले की, या उपाययोजनांचा उद्देश शस्त्रास्त्रांची वाहतूक रोखणे हा आहे. जहाजांना मार्ग खुला ठेवला जाईल, मात्र तपासणी प्रक्रियेमुळे विलंब होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

युद्धविरामनंतरही होर्मुझमधून जलवाहतुकीत घट
युद्धविराम असूनही होर्मुझ सामुद्रधुनीतील जलवाहतुकीवर मोठा परिणाम दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत केवळ एक तेलवाहू आणि काही मालवाहू जहाजांनी या मार्गाचा वापर केला आहे. पूर्वी दररोज सुमारे 140 जहाजांची ये-जा होत असताना, संघर्ष सुरू झाल्यापासून या संख्येत मोठी घट झाली आहे. इराणच्या लष्करी दलाने जहाजांसाठी नवीन मार्गदर्शक नकाशा जाहीर केला आहे. संभाव्य भूसुरुंग क्षेत्र टाळण्यासाठी काही भाग धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला असून, त्या क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. जहाजांना सुरक्षित मार्गाने प्रवास करण्यासाठी इराणी अधिकार्‍यांशी संपर्क ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

COMMENTS