बेलापूर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वामुळे आणि सहकार्यामुळे बेलापूरमधील अनेक विकासकामांना गती मिळाली असून गावात विकासाचे नवे पर्व स

बेलापूर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वामुळे आणि सहकार्यामुळे बेलापूरमधील अनेक विकासकामांना गती मिळाली असून गावात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना अधिक बळकट करून पक्षाला वैभवाच्या शिखरावर नेण्याचे काम करावे, असा विश्वास तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शरद नवले यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सचिवपदी निलेश हरदास, बेलापूर शहराध्यक्षपदी प्रफुल्ल डावरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल, ज्येष्ठ नागरिक कणजीशेठ टाक व युवक नेते अभिषेक खंडागळे यांना विविध पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल, तसेच सनदी लेखापाल परीक्षेत यश मिळविल्याबद्दल श्रीकांत वैष्णव आणि वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद नवले होते.
यावेळी नवले म्हणाले, “राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकारामुळे पाणीपुरवठा योजना, घरकुल वसाहत यांसारखी महत्त्वाची विकासकामे मार्गी लागली. काही विरोधकांना गावातील विकास पाहवत नसल्याने ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीका करीत आहेत. विरोधकांच्या ताब्यातील संस्थांमधील कारभाराकडे लक्ष देण्याचा सल्ला देत त्यांनी टीकेची झोड उठविली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम भराटे यांनी केले. जालिंदर कुऱ्हे, विष्णुपंत डावरे, भास्कर खंडागळे, इस्माईल शेख, संजय भोंडगे, अभिषेक खंडागळे आणि प्रफुल्ल डावरे यांनी मनोगत व्यक्त केले.
अभिषेक खंडागळे यांनी निलेश हरदास आणि प्रफुल्ल डावरे यांना पक्षाने संधी दिल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे आणि दीपक पटारे यांचे आभार मानले.कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास भाऊसाहेब कुताळ, भोंडगे दादा,रावसाहेब अमोलिक,मुश्ताक शेख,अरविंद साळवी, सचिन अमोलिक,भाऊसाहेब तेलोरे,बंटी शेलार,रवी लाखोटीया, श्रीकांत राठी आदी उपस्थित होते.

COMMENTS