श्रीगोंदा : महाराष्ट्राच्या प्राचीन सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा ठेवा असलेल्या १० ते २० हजार वर्षांपूर्वीच्या कातळशिल्पांच्या संवर्धनाला आता नवी दिशा मिळण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२६ मध्ये आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांनी हा महत्त्वपूर्ण विषय विधानसभेत उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले.आमदार पाचपुते यांनी सभागृहात मांडलेल्या प्रश्नात प्रागैतिहासिक काळातील कातळशिल्पांचे ऐतिहासिक, सांस्कृतिक व पुरातत्त्वीय महत्त्व अधोरेखित केले. या अमूल्य वारशाचे संवर्धन, संरक्षण आणि व्यापक जनजागृती करण्यासाठी शासन कोणती पावले उचलणार, याबाबत त्यांनी माहिती मागितली.यावेळी दिवंगत राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक स्व. विवेक वाघ यांनी त्यांच्या Neon Reels Creation या संस्थेच्या माध्यमातून कातळशिल्पांवर तयार केलेल्या माहितीपटाचा उल्लेख करत, आगामी नव्या माहितीपटाच्या निर्मितीसाठी त्या माहितीपटाचा अभ्यास केला जाणार का, असा विशिष्ट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्टपणे “होय” असे उत्तर दिले. स्व. विवेक वाघ यांच्या माहितीपटाचा अभ्यास करून पुढील निर्मितीमध्ये त्याचा विचार केला जाईल, तसेच कातळशिल्पांच्या संवर्धनाबाबत शासन सकारात्मक असून आवश्यक ती पावले उचलली जातील, अशी भूमिका त्यांनी सभागृहात मांडली.शासनाच्या या भूमिकेमुळे राज्यातील प्रागैतिहासिक कातळशिल्पांच्या संशोधन, दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि पर्यटन विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यामुळे इतिहास अभ्यासक, पुरातत्त्व संशोधक, सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकार आणि वारसा संवर्धनासाठी कार्यरत संस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे, हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी जीवनशैली, कला आणि संस्कृतीची साक्ष देणारी ही कातळशिल्पे महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची ओळख आहेत. त्यांचे वैज्ञानिक पद्धतीने जतन करून पुढील पिढ्यांसाठी हा अमूल्य ठेवा सुरक्षित ठेवणे ही काळाची गरज असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.विधानसभेत या विषयावर झालेली चर्चा आणि शासनाने दिलेला सकारात्मक प्रतिसाद हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भविष्यात कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबवल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

COMMENTS