अकोले : तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायनावाडी येथे मिशन आपुलकी उपक्रम अंतर्गत शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप कर

अकोले : तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायनावाडी येथे मिशन आपुलकी उपक्रम अंतर्गत शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. एन डी स्टुडिओ फिल्म सिटीचे महेश भांगरे, ज्योती भांगरे त्यांचे चिरंजीव हार्दिक भांगरे,त्याचबरोबर केंद्र प्रमुख विजय भांगरे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना बॅग,रेनकोट,बॉटल,कंपास,सर्व प्रकारच्या वह्या,पेन्सिल,पेन,सर्व प्रकारच्या स्टेशनरी अश्या अनेक साहित्याचे वर्षभर वापरता येईल असे सर्व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.सुमारे ६० ते ७० हजाराच्या दरम्यान वस्तू रूपाने देण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आशा स्वरूपाचे योगदान अतिशय प्रेरणादायी व उपयुक्त ठरत आहे.सामाजिक भान आणि शैक्षणिक योगदान आमच्या सदैव स्मरणात राहील भविष्यातही आपले असेच सहकार्य मिळत राहो,असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती गवळी यांनी दिले
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित एन डी स्टुडिओ फिल्म सिटी चे महेश भांगरे,विठ्ठल भांगरे,ज्योती भांगरे,केंद्र प्रमुख विजय भांगरे,हरिदास भांगरे,काळू भांगरे,माझी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष बाजीराव भांगरे,शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती गवळी,सहशिक्षक सोमनाथ गोडे,ईदेवाडीचे मुख्याध्यापक रामभाऊ आवारी,गोरख भांगरे, सोमनाथ भांगरे,लक्ष्मण भांगरे,अंगणवाडी सेविका तसेच गावातील ग्रामस्थ महिला उपस्थित होते.सूत्रचंचालन सहशिक्षक सोमनाथ गोडे यांनी केले.तसेच कार्यक्रमाचे आभार काळू भांगरे यांनी मानले.

COMMENTS