Homeताज्या बातम्या

महात्मा फुले कृषि विद्यापीठात योगदिन उत्साहात  

देवळाली प्रवरा : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे 12 वा आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास ख

योगामुळे आत्मिक उन्नती होते : गोसावी
उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी : सुरेश पाटील
योग मानवी चेतनेशी जोडणारा सेतू : पंतप्रधान मोदी


देवळाली प्रवरा : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे 12 वा आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे होते. यावेळी संचालक, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी, आंतरविद्याशाखा जलसिंचन विभाग प्रमुख डॉ. विजय पाटील, कुलगुरूंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहीरे तसेच प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास देशमुख उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. साताप्पा खरबडे म्हणाले की, योगाचे महत्त्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण असून दैनंदिन जीवनात योग व प्राणायामाचा अंगीकार केल्यास शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते. शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन राखण्यासाठी योग आवश्यक आहे. “निरोगी वृद्धत्वासाठी योग” ही यंदाच्या योगदिनाची संकल्पना असून वयोमानानुसार उद्भवणाऱ्या शारीरिक व्याधींवर मात करण्यासाठी तसेच शरीराचा लवचीकपणा टिकवून ठेवण्यासाठी योग उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
योगशिक्षक डॉ. बी. डी. पाटील आणि रविंद्र आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सविनय शिंदे, डॉ. क्रांती पाटील, सुंदरम घुले, कृष्णा पवार आणि कु. शिवानी शिंदे यांनी योग व प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विलास आवारी यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. जितेंद्र मेटकर यांनी केले.
या कार्यक्रमात उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा, विद्यापीठातील अधिकारी-कर्मचारी, पदव्युत्तर महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक व इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.  

COMMENTS