Homeताज्या बातम्या

अवैध प्रकारांची तक्रार केल्याचा राग?; वनपरिक्षेत्राधिकार्‍यांनी धमकी दिल्याचा भाजप पदाधिकार्‍यांचा आरोप

हदगाव किसान सभेच्या तालुकाध्यक्षांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी तामसा : नांदेड वनपरिक्षेत्रातील कथित अवैध प्रकारांची तक्

दानशूर व सशुल्क दर्शन आरती घेणार्‍या साईभक्तांना लाडु प्रसाद पाकीट सुरू करा ः साईराज गायकवाड 
सर्जेराव तात्या तांदळे यांच्या हस्ते मातोश्री विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत
अरुण गोयल यांनी स्वीकारला निवडणूक आयुक्ताचा पदभार

हदगाव किसान सभेच्या तालुकाध्यक्षांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

तामसा : नांदेड वनपरिक्षेत्रातील कथित अवैध प्रकारांची तक्रार आणि वृत्त प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून नांदेडचे वनपरिक्षेत्राधिकारी अनिल रासने यांनी मोबाईलवरून धमकी दिल्याचा आरोप भाजप किसान सभेचे हदगाव तालुकाध्यक्ष विलासराव महाजन यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी नांदेडचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार देऊन सखोल चौकशी करून संबंधित अधिकार्‍यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महाजन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 6 जुलै 2026 रोजी त्यांनी नांदेड वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्याकडे नांदेड वनपरिक्षेत्रातील राखीव वनक्षेत्रात डिंक संकलनासाठी मोठ्या प्रमाणात झाडांना गंभीर जखमा करून धोकादायक रसायनांचा वापर होत असल्याची तक्रार केली होती. या प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी व काही कर्मचार्‍यांच्या संगनमतातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप त्यांनी केला होता. या संदर्भातील वृत्तही विविध माध्यमांत प्रसिद्ध झाले होते.

या तक्रारीनंतर संतप्त झालेल्या वनपरिक्षेत्राधिकारी अनिल रासने यांनी मोबाईलवरून संपर्क साधून, “तू आमच्या विभागाविरोधात तक्रार आणि बातमी का दिलीस? तू खूप मोठा कार्यकर्ता आहेस का? तुला बघून घेतो,” अशा शब्दांत धमकी दिल्याचा आरोप महाजन यांनी तक्रारीत केला आहे. या कथित धमकीप्रकरणी महाजन यांनी 27 जुलै 2026 रोजी नांदेडचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली असून, कॉल रेकॉर्डसह प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

COMMENTS