संगमनेरात अत्याचार करून महिलेचा खून ; अवघ्या ४८ तासात आरोपी गजाआड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरात अत्याचार करून महिलेचा खून ; अवघ्या ४८ तासात आरोपी गजाआड

संगमनेर/प्रतिनिधी।२५संगमनेर शहराजवळ सोमवार दि.२२ रोजी घुलेवाडी शिवारात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाची उकल शहर पोलिसांनी केली आहे. अज

पाथर्डीचे तालुका आरोग्यधिकारी सक्तीच्या रजेवर
Pune : ‘महाराष्ट्र बंद’ ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा… (Video)
घरीच थांबा, तुम्हा शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाईन’ संभाजीराजेंचं आवाहनl पहा LokNews24

संगमनेर/प्रतिनिधी।२५संगमनेर शहराजवळ सोमवार दि.२२ रोजी घुलेवाडी शिवारात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाची उकल शहर पोलिसांनी केली आहे. अज्ञात महिलेचा खून करून तिला नग्नअवस्थेत येथील सेप्टिक टॅंकमध्ये टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पो.नि. मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे पोसई. पंकज शिंदे, पोसई. निकिता महाले, सफॊ. राजेंद्र गायकवाड़, पोना. अमित महाजन, विजय पवार, सचिन उगले, फुरखान शेख, पोकॉ. अमृत आढाव, साईनाथ तळेकर यांनी अवघ्या ४८ तासात याप्रकरणातील खुनी आरोपीला कोपरगाव येथून अटक केली आहे. रुपचंद वर्मा (वय-४५, मूळ रा. रायपूर छत्तीसगड) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून घुलेवाडी शिवारातील नाशिक पुणे महामार्गावर विकास ढाबा याठिकाणी तो वेटरचे काम करत होता. तसेच आरोपी वर्मा याने त्याने केलेल्या वरील गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी वर्मा याने घटनेच्या दिवशी दारूच्या नशेत मयत महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. महिलेने संबंधास नकार दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करीत अत्याचार करून त्याने महिलेचा खून केला. तसेच महिलेचा मृतदेह नग्न अवस्थेत जवळच असलेल्या सेप्टिक टॅंक मध्ये टाकून दिला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी मिळून आलेल्या वस्तूंच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. त्यानुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गु.रजि. क्र. ६४४/२०२१ भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे दाखल गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली आहे.  

COMMENTS