Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यापार्‍याच्या मुलाच्या अपहरणात चौघांना अटक; पोलिसांची धडक कारवाई

खंडाळा / प्रतिनिधी : येथील पोलिसांनी धडक कारवाई करून अपहरण केलेल्या व्यापार्‍याच्या मुलाची सहा तासांत सुटका करून चार संशयितांना अटक केली. बारामती ताल

ओगलेवाडीत जिवंत कासव, मांडूळ विक्रीसाठी घेवून फिरणारे चौघे वनविभागाच्या ताब्यात
12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
जावळी तालुक्यात रब्बीच्या पेरणीस बैलजोडीला ट्रॅक्टरचा पर्याय

खंडाळा / प्रतिनिधी : येथील पोलिसांनी धडक कारवाई करून अपहरण केलेल्या व्यापार्‍याच्या मुलाची सहा तासांत सुटका करून चार संशयितांना अटक केली. बारामती तालुक्यातील आकाश रघुनाथ टेंगळे (वय 28, रा. मानोपोवाडी (पणदरे), अल्ताफ अब्बास इनामदार (वय 40, रा. म्हस्कोबाचीवाडी (पणदरे), राहुल भारत सोनवणे (वय 33, माळेगाव बु।) व कुलदीप चंद्रकांत जावळे (वय 24, रा. माळेगाव बु।) यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
याबाबत खंडाळा पोलिसांनी सांगितले, की विटा, ता. खानापूर, जि. सांगली येथील व्यापार्‍याचा मुलगा पुणे येथून सांगलीला परतत असताना अनोळखी व्यक्तीने व्यापार्‍याच्या मुलाच्या मोबाईल फोनवर फोन करून व्यवसायनिमित्त बोलायचे आहे, असे सांगून त्यांना पारगाव एसटी स्टँडजवळील बिअर बारमध्ये बोलावून घेतले.
त्याप्रमाणे व्यापारी व मुलगा आले असता उसने घेतलेले पैसे परत करा, अन्यथा मुलगा अनिकेत यास घेऊन जाऊ, असे सांगून जीपमध्ये मुलास घालून चारजण गेले. यानंतर तपासाची गती फिरवून खंडाळा पोलिसांनी माळेगाव (ता. बारामती) येथून सहा तासांत संशयितास जेरबंद केले. या घटनेची फिर्याद मिलिंद भगवान टिके (सध्या रा. विटा, ता. खानापूर, जि. सांगली) यांनी दिली. तपास पोलीस शशिकांत क्षीरसागर करत आहेत.

COMMENTS