Homeताज्या बातम्या

‘राष्ट्रीय दर्जा’ मिळवण्यासाठी आवश्यक निकष काय आहेत? जाणून घ्या नागपूर बाजार समितीची वैशिष्ट्ये!

नागपूर : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय दर्जा

पुरुषोत्तमपुरी गोदापात्रात बुडणार्‍या भाविकास वाचवले; जवानांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार
शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा आज रास्तारोको
विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
Nagpur Agri Market Gets National Importance Status; High-Power Committee  Formed

नागपूर : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक असणारे निकष, बाजार समितीची व्याप्ती आणि नवीन नियमावली स्पष्ट झाली आहे.

राष्ट्रीय दर्जासाठी आवश्यक निकष आणि नागपूरची स्थिती:

  • वार्षिक उलाढाल : ८०,००० टनांपेक्षा जास्त आवक आणि दोन किंवा अधिक राज्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे.
  • बाजार समितीचे कार्यक्षेत्र : नागपूर मुख्य बाजारासह कळमना आणि इतर उपबाजाऱ्यांचा यामध्ये समावेश होतो.
  • ११ राज्यांतून आवक : मध्य प्रदेश, छत्तीसगड, तमिळनाडू, केरळ, कर्नाटकसह देशातील ११ राज्यांतून येथे शेतमाल येतो.
  • प्रमुख शेतमाल उलाढाल : कापूस, सोयाबीन, संत्री, तृणधान्ये आणि भाज्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होते.
  • विक्रमी वार्षिक उलाढाल : सन २०२४-२५ मध्ये बाजार समितीला ६२ कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे.
  • एकल व्यापार लायसन्स : संपूर्ण महाराष्ट्रासाठी ‘युनिकोड’ असलेला एकच परवाना (सिंगल लायसन्स) लागू असेल.
  • आंतरराज्यीय ई-व्यापार : इतर राज्यातील व्यापाऱ्यांनाही आता थेट व्यापाराची परवानगी असणार आहे.

वाद निवारणासाठी ३० दिवसांची ‘फास्ट ट्रॅक’ यंत्रणा! व्यापारी, शेतकरी आणि बाजार समिती यांच्यात शेतमालाची गुणवत्ता, वजन, पेमेंट किंवा ई-प्लॅटफॉर्मवरील व्यवहारांवरून काहीही वाद उद्भवल्यास, ३० दिवसांच्या आत संक्षिप्त स्वरूपात निकाल देणे प्राधिकृत अधिकाऱ्याला बंधनकारक असेल. या आदेशाविरुद्ध पुढील ३० दिवसांत राज्य शासनाकडे अपील करता येईल आणि अपीलीय प्राधिकरणालाही ते अपील ३० दिवसांच्या आत निकाली काढावे लागेल.

नागपूरला आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र बनवणार!

“नागपूरला आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार केंद्र बनवण्याचा आमचा संकल्प आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर्जा आणि जागतिक मूल्य मिळावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेने व मार्गदर्शनात हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. विदर्भाचा शेतमाल आता थेट देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर जाईल, ज्यामुळे त्याचे मूल्य वाढेल. या ऐतिहासिक निर्णयाचा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही अफाट फायदा होणार आहे.” – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री तथा पालकमंत्री, नागपूर

COMMENTS