Homeताज्या बातम्या

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने पणन; मंत्री जयकुमार रावल यांचा निर्णय

नागपूर कृषी उत्पन्न समितीला 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' चा दर्जा मुंबई : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला 'राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा'

देशात पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात विकसित होणार; विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवणार
महाराष्ट्रात मंत्र्यांच्या विमान प्रवासावर निर्बंधमुख्यमंत्री फडणवीस यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विश्वास नांगरे पाटलांचे समर्थन; मुख्यमंत्री व उद्धव ठाकरेंच्या विमान प्रवासावरही दिली प्रतिक्रिया
Revenue Minister Chandrashekhar Bawankule orders action against guilty  officials within fifteen days pune | | Chandrashekhar Bawankule: दोषी  अधिकाऱ्यांवर पंधरा दिवसांत कारवाई; महसूलमंत्री चंद्रशेखर ...

नागपूर कृषी उत्पन्न समितीला ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार’ चा दर्जा

मुंबई : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ‘राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा’ दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. चार लाख मेट्रिक टन मालाची वार्षिक उलाढाल आणि देशातील अकरा राज्यांमधून या ठिकाणी होणारी शेतीमालाची आवक, या बाबी हा निर्णय होण्यासाठी जमेची बाजू ठरल्या आहेत.

विदर्भाच्या आर्थिक आणि कृषी क्षेत्राच्या विस्तारासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अथक व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागपूरचा कृषी बाजार आता थेट देशाच्या मुख्य व्यापारी प्रवाहात सामील झाला आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाने महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात ३१ डिसेंबर २०२५ रोजी सुधारणा केल्यानंतर आज या निर्णयाची अधिसूचना जारी करण्यात आली.

बाजार समितीची नवी रचना कशी असेल?

  • अध्यक्ष व उपाध्यक्ष : पणनमंत्री आणि पणन राज्यमंत्री.
  • शासकीय प्रतिनिधी : कृषी व पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी.
  • शेतकरी प्रतिनिधी : स्थानिक आणि परराज्यांतील सात शेतकरी.
  • व्यापारी व तज्ज्ञ : तीन व्यापारी व एक तज्ज्ञ व्यक्ती.
  • मुख्य सचिव : सहनिबंधक दर्जाचा शासकीय अधिकारी.
  • विशेष निमंत्रित : मतदानाचा हक्क नसलेले गट ‘अ’ दर्जाचे अधिकारी.

COMMENTS