Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

स्त्री जन्माचे स्वागत करा’ : जनजागृती कार्यशाळेला  डॉ.सुधा कांकरिया यांनी मार्गदर्शन केले

ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने ’स्त्री जन्माचे स्वागत करा’ या कार्यक्रमात जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्

जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियञण कार्यक्रम वतीने घाट सावळीत जनजागृती शिबीर संपन्न.जिल्हा शल्यचिकित्सक सतिश कुमार सोळुंके यांचे अभियान.
राहुरीत बनावट डॉक्टर; गुन्हा दाखल 
माता-बाल संगोपनात बीड राज्यात अव्वल; मात्र 21 कोटींची माता व बाल संगोपन इमारत अडीच वर्षांपासून धुळखात पडुनपालकमंत्री सुनेत्राताईंनी दिवंगत अजितदादांचे स्वप्न पूर्ण करावे – डॉ. गणेश ढवळे



ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने ’स्त्री जन्माचे स्वागत करा’ या कार्यक्रमात जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून पीसीपीएनडीटी स्टेट सुपरवायजरी बोर्ड सदस्या डॉ. सुधा कांकरिया उपस्थित होत्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा  वैशालीताई देशमुख, नगरसेविका  डॉ.पल्लवीताई लंगडे,चेअरमन प्रवीण देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीकांत देसाई, डॉ.उत्तमराव इंगळे,ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षीका डॉ.विद्या झिने,डॉ.युवराज डाहाळे,डॉ.विशाल लंगडे, डॉ.आनंद शिंदे आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.उपस्थीत मान्यवरांच्या सत्कार ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी बोलतांना डॉ.सुधा कांकरिया म्हणाला की या चळवळीअंतर्गत 11 कलमी कार्यक्रम राबवून स्त्री जन्माचे नुसते स्वागत नको प्रत्येक घरोघरी जाऊन मानसिकता बदलण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.तसेच स्त्री भ्रुण हत्या प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी व मुलगी जन्माचे स्वागत कशा पद्धतीने केले पाहिजे यासाठी प्रखरभुमीका घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन उपस्थितांना डॉ.सुधा कांकरिया यांनी केले आहे.यावेळी अनेक मान्यवरांची संमोचित भाषणे झाली. या कार्यशाळेस आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांना,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.

COMMENTS