Homeक्रीडा

विराट कोहलीचा मोठा पराक्रम, सचिन तेंडुलकरचा मोडला विक्रम

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिल्ली कसोटीत मोठी कामगिरी केली. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावा पूर्ण

वनडे क्रमवारीत विराट कोहलीची सहाव्या स्थानी झेप
विराट कोहलीने तोडले सचिनचे तीन विक्रम
आंतरराष्ट्रीय लोककला स्पर्धेसाठी संगमनेरच्या त्रिशा कदमची निवड; ‘भारत महोत्सव २०२६’ मध्ये मिळवला प्रथम क्रमांक

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिल्ली कसोटीत मोठी कामगिरी केली. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावा पूर्ण करून इतिहास रचला. कोहलीने पहिल्या डावात 44 आणि दुसऱ्या डावात 20 धावा केल्या. तो सर्वात जलद 25,000 धावा करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. या प्रकरणात विराटने महान खेळाडू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

कोहलीने त्याच्या 549 व्या आंतरराष्ट्रीय डावात हा आकडा गाठला. दुसरीकडे सचिन तेंडुलकरने यासाठी 577 डाव खेळले होते. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने 588 धावा, दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिसने 594, श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा 608 आणि महेला जयवर्धनेने 701 डावात 25000 धावा पूर्ण केल्या.

COMMENTS