Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

20 मे रोजी औषध विक्रेता बंद; रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन सज्ज

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने(एआयओसीडी) ऑनलाईन औषध विक्री, ई-पोर्टल तसेच केंद्र शासनाच्या काही आदेशांविरोधात 20 मे रोजी देशव्यापी एक दिवसीय ब

मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठलाची शासकीय महापूजा
अशोकराव चव्हाणांच्या खंद्या समर्थकाचे नाव चर्चेत; ‘निष्ठावंतांना’ पुन्हा डावलणार?
ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक चिंतेत



अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने(एआयओसीडी) ऑनलाईन औषध विक्री, ई-पोर्टल तसेच केंद्र शासनाच्या काही आदेशांविरोधात 20 मे रोजी देशव्यापी एक दिवसीय बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
नांदेड शहरासह तालुका आणि ग्रामीण भागातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनला औषधांची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही रुग्णाला औषधांअभावी अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सामान्य रुग्णालय, नांदेड-वाघाळा महानगरपालिका आरोग्य विभाग आणि डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाला पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंदच्या कालावधीत अत्यावश्यक औषधे उपलब्ध न झाल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) अ.तु. राठोड यांच्याशी 8369027068 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवावीत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS