filter: 109; fileterIntensity: 0.8; filterMask: 0; captureOrientation: 0;algolist: 0;multi-frame: 1;brp_mask:0;brp_del_th:0.0000,0.0000;brp_del_sen:0

algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:0;
brp_del_th:0.0000,0.0000;
brp_del_sen:0.0000,0.0000;
motionR: null;
delta:null;
bokeh:0;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 4194304;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 235.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 44;
पाथर्डी : नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदारांनी जो विश्वास दाखवला तो आम्ही सर्व जण सार्थ ठरवत शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे आगामी काळात करू, गेल्या काही वर्षात आ. मोनिका राजळे यांनी शहर विकासासाठी मोठा निधी आणल्याने झपाट्याने विकास करता आला असे प्रतिपादन नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले. नगरपालिकेच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी उपनगराध्यक्षा मंगल कोकाटे, नगरसेवक नंदकुमार शेळके,बजरंग घोडके, बंडू बोरुडे,सुभाष बोरुडे,संजय देशमुख, डॉ.जगदीश मुने, प्रतीक नांगरे, देवा पवार,नगरसेविका सविता भापकर, मनीषा उदमले, किरण खेडकर, वंदना टेके, ज्योती पवार, मंगल सोनटक्के, रेखा हंडाळ तसेच आजिनाथ मोरे, संदीप पवार, बाळासाहेब सोनटक्के, पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे हे उपस्थित होते.
या वेळी पालिकेचे निवृत्त व बदली झालेली कर्मचारी सोमनाथ गर्जे,दत्तात्रय टेके,सुरेश शेटे,काळु पवार माजी नगरसेवक राधाकिसन सबलस यांना गौरवण्यात आले. केक कापून व पालिकेच्या इमारतीला सजावट करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
पुढे बोलताना आव्हाड म्हणाले की, स्व.राजीव राजळे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली होती.राजळे यांच्याकडे दूरदृष्टी होती. आज ते असते तर पाथर्डी बारामती सारखी झाली असती. गेल्या काही वर्षात आमदार मोनिका राजळे यांनी शहर विकासासाठी मोठा निधी आणल्याने शहराचा झपाट्याने विकास करता आला. विधानपरिषद निवडणूकीची आचारसहिंता सुरु झाल्याने वर्धापन दिनासाठी ज्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ते रद्द करावे लागले.
सभागृहात जेष्ठ सदस्य असलेल्या नंदकुमार शेळके यांचा संयमाचा वारसा सर्वानी घ्यायला हवा.पालिकेचे कामकाज करताना मुख्यधिकारी लांडगे व सर्व अधिकारी व कर्मचारी चांगली साथ देत असल्याचे आव्हाड म्हणाले. प्रास्ताविक संतोष लांडगे सूत्रसंचालन अनिल कोळगे तर आभार प्रदीप पारखे यांनी मानले.

COMMENTS