Homeताज्या बातम्याअहमदनगर

बाणेश्वर विद्यालयातील गुणवंतांचा आ. कर्डिलेंकडून सन्मान

अहिल्यानगर : बुऱ्हाणनगर येथील श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल ९८.७४ टक्के लागला असून बारावी परीक्षेत कला शाखेचा निकाल ८८.७५, वाणिज्य शाखेचा ८५.३३ तर विज्ञान शाखेचा निकाल ९८.०७ टक्के लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष आ.अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष कराळे, बोर्डे, संस्थेचे संचालक मंडळ, ग्रामस्थ, विद्यालयाचे प्राचार्य के. एम. हापसे, सी. डी. शिकारे, आर. वाय. झावरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावी परीक्षेत कार्तिकी तुकाराम कर्डिले व श्रेया भाऊसाहेब वारुळे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. गायत्री दत्तात्रय कर्डिले हिने द्वितीय तर श्रद्धा विजय कलमदाणे हिने तृतीय क्रमांक मिळविला.बारावी कला शाखेत वैष्णवी विनोद बुहाडे हिने प्रथम, भाग्यश्री मोहन पटेकर हिने द्वितीय तर श्रद्धा अमोल गवारे हिने तृतीय क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेत दिपाली विष्णू डोके हिने प्रथम, प्रतिक्षा राजेंद्र वारुळे हिने द्वितीय तर अनुजा लक्ष्मण लष्करे हिने तृतीय क्रमांक पटकाविला.विज्ञान शाखेत तनुश्री प्रकाश शिदोरे हिने प्रथम, तन्वी ज्ञानेश्वर तापकिरे हिने द्वितीय, तनिष्क सोमनाथ बनसोडे याने तृतीय तर परमेश्वरी संग्राम जगताप हिने चतुर्थ क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आ.अक्षय शिवाजीराव कर्डिले, संचालक मंडळ, ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

सय्यद समीया दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश
सय्यद समीया दहावीच्या परीक्षेत यश
मुप्टा बीड जिल्हा वतीने गुणवंत विद्यार्थी चि. अभिवादन जावळे यांचा गौरव

COMMENTS